हॉटेल, रेस्टॉरंटचालकांना सेवाशुल्क आकारण्यास बंदी

हॉटेल, रेस्टॉरंटचालकांना सेवाशुल्क आकारण्यास बंदी
Published on
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : हॉटेल तसेच रेस्टॉरंटचालकांनी खाद्यपदार्थांच्या बिलात सर्व्हिस चार्ज आकारू नये, असे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सोमवारी जारी केले. टिप म्हणून वा सेवेवर खूश होऊन ग्राहकाने स्वत:हून काही पैसे दिल्यास ती बाब सर्वस्वी वेगळी आहे; पण हॉटेल वा रेस्टॉरंटचालक इथून पुढे ग्राहकांवर सर्व्हिस चार्जची सक्‍ती करू शकणार नाहीत.

सर्व्हिस चार्जवर बंदी घालण्यात आली आहे म्हणून हे पैसे अन्य कुठल्यातरी नावाने ग्राहकांकडून वसूल करण्याची शक्‍कलही हॉटेल, रेस्टॉरंटचालकांनी लढवू नये, अशी टिपणीही या आदेशात करण्यात आली आहे. याउपर सर्व्हिस चार्जची आकारणी हॉटेल, रेस्टॉरंटमालकाने केल्यास ग्राहक त्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक 1915 वर तक्रार नोंदवू शकतील.

यापूर्वी 2017 मध्ये याबाबतची नियमावली ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने  जारी केली होती. त्यात बिलामध्ये सर्व्हिस चार्जचा रकाना छापण्याची मुभा देण्यात आली होती; पण ती या रकान्यात ग्राहकाने स्वखुशीने रक्‍कम भरण्यासाठी म्हणून देण्यात आली होती. हॉटेल वा रेस्टॉरंटचालकाने स्वत: ही रक्‍कम ठरविण्यासाठी नव्हे, असेही प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हॉटेल, रेस्टॉरंटचालकांनी इथून पुढे बिलात सर्व्हिस चार्ज आकारल्यास ग्राहक संरक्षण कायद्यासह संशोधित कायदा 2019 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्राधिकरणाकडून देण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news