हरनाझ संधूला करायचा आहे ‘पीसी’चा बायोपिक

Harnaaz Sandhu
Harnaaz Sandhu

पुढारी ऑनलाईन

भारताची एखादी युवती मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकली की, तिच्या बॉलीवूड पदार्पणाचे वेध लागतात. माजी विश्‍वसुंदरी मानुषी छिल्लर अक्षयकुमारसोबत 'पृथ्वीराज' चित्रपटातून पुढील वर्षी बॉलीवूड पदार्पण करत आहे, तर नुकताच 2021 चा मिस युनिव्हर्स किताब मिळवून जगभरात भारताचा लौकिक वाढविलेल्या हरनाझ संधूनेदेखील चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हरनाझला जेव्हा विचारण्यात आले की, तिला कुणाचा बायोपिक करायला आवडेल, तेव्हा तिने अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव घेतले. प्रियांकाचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे, तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, प्रियांकाने स्वतःला ब्रँड बनवले आहे, तिच्या मार्गावरून चालायला आवडेल, असे ती म्हणाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news