लंडन ः हंगेरीमध्ये उत्खननात अतिशय दुर्मीळ सोन्याचे नाणे सापडले आहे. या नाण्यावर खून झालेल्या रोमन सम—ाटाची प्रतिमा कोरलेली आहे. इसवी सनाच्या तिसर्या शतकातील या अत्यंत दुर्मीळ अशा नाण्यावर सम—ाट व्होलुसियानस याचा चेहरा कोरलेला असून, त्याने आपल्या पित्यासमवेत दोन वर्षे रोमन साम—ाज्यावर सत्ता गाजवली होती. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी या तरुण सम—टाची त्याच्या स्वतःच्याच सैनिकांनी हत्या केली.
व्होलुसियानसची कारकीर्द अत्यंत अल्पकाळाची असल्याने त्याच्या चेहर्याची अतिशय कमी नाणी उपलब्ध आहेत. हंगेरीतील झेगेड युनिव्हर्सिटीतील माटे व्हर्गा या पुरातत्त्व संशोधक महिलेने सांगितले की, हंगेरीतील रोमन काळातील नाणीही अत्यंत दुर्मीळ आहेत. अशा स्थितीत या सम—ाटाचे नाणे मिळणे तर अतिशय दुर्मीळ घटना आहे.
कॅपोस्वार येथील रिपल-रोनाई म्युझियममधील तज्ज्ञाने हे नाणे शोधले. सोमोगी कौंटीतील या ठिकाणी एके काळी रोमन वसाहत होती. तिथे हे उत्खनन करण्यासाठी पुरातत्त्व संशोधकांचे एक पथक गेले होते. हे ठिकाण नेमके कुठे आहे, याची माहिती गुप्तच ठेवण्यात आली आहे. अवैध मेटल डिटेक्टर्सनी याठिकाणी येऊन तेथील दडलेला अनमोल खजिना लंपास करू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.