नवी दिल्ली : स्मार्ट फोनमध्ये असलेल्या काही अॅप्समुळे तुमच्या फोनची बॅटरी आणि डेटा वेगाने संपतो. त्यामुळे हे अॅप्स गुगल प्ले -स्टोअरवरून काढली आहेत. चला मग तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून ही अॅप्स तत्काळ काढून टाका.कारण या अॅप्सच्या माध्यमातून तुमची फसवणूक होत असते. या अॅप्समुळे बॅटरी झपाट्याने संपते तर यूझजर्सचा डेटाही गुपचूप वापरत असल्याचे समोर आले आहे.
हे अॅप्स अँटिव्हायरस कंपनी मॅकफीने शोधले आहेत. मॅकफीने अहवाल दिल्यानंतर गुगल-प्ले स्टोअरवरून संबंधित अॅप्स काढून टाकले आहेत. जॉयकोड, करन्सी कन्व्हर्टर, हाय-स्पीड कॅमेरा, स्मार्ट टास्क मॅनेजर, प्लॅशलाईट, के-डिक्शनरी, क्विक नोट, इजडिका, इन्टाग्राम प्रोफाईल डाऊनलोड आणि ईजेड नोटस् या धोकादायक अॅप्सची यादी मॅकफीने गुगल-प्ले स्टोअरला दिली आहे. वापरकर्त्यांच्या माहितीशिवाय, त्यांच्या फोनमध्ये लिंक क्लिक केल्या जातात आणि जाहिराती प्ले होत राहतात. यामुळे यूजर्सचा डेटा आणि फोनची बॅटरी दोन्ही खर्च होतात.