सोलापूर : वैराग येथे युवकाचा भरदिवसा खून

सोलापूर : वैराग येथे युवकाचा भरदिवसा खून
Published on
Updated on

वैराग ; पुढारी वृत्तसेवा : चोरीच्या सोन्याचा पोलिसांकडे टोळीचा भांडाफोड करतो, म्हणाल्याचा राग धरून तिघांनी वैराग येथे सचिन ऊर्फ पप्पू महादेव पवार (रा. वैराग, ता. बार्शी) या तरुणाचा भर दिवसा धारधार हत्याराने खून केला. शनिवारी दुपारी चारच्या दरम्यान वैराग-सोलापूर रस्त्यावर हल्ला झाला होता.

उपचारादरम्यान सोलापुरात पप्पू सचिन पवार याचा रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी वैराग पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून, उर्वरित तीन संशयित आरोपी फरार आहेत.

सचिन ऊर्फ पप्पू पवार हा वैराग येथील हरी केकडे व त्यांच्या टोळीमधील साथीदार जुबेर शेख, मिथुन साळवे आणि अखिल यांचा मित्र आहे. त्यांच्या टोळीतील सोने चोरीतील भांडण सोडविण्यासाठी सचिन पवार हा सोलापूर रोडवरील विठ्ठल कांबळे यांच्या चप्पल दुकानात गेला होता.

भांडण मिटल्यानंतर तुमच्या चोरीच्या सोन्याच्या टोळीबद्दल पोलिसांनी माहिती देतो, असे पप्पू पवार याने धमकी दिली. त्याचा राग मनात धरून हरी केकडे यांच्या सांगण्यावरून पप्पू पवार यास लाकडी ठोकळ्याने व धारधार हत्याराने जुबेर शेख, मिथुन साळवे आणि अखिल यांनी मारहाण केली. त्यानंतर सचिनची मोटारसायकल घेऊन फरार झाले.

दरम्यान या घटनेची माहिती सचिनचा भाऊ सुरेश महादेव पवार यांना मिळाली. तो आपल्या आईसह घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी जखमी सचिनला उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण त्याची प्रकृती गंभीर बनल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले.

सोलापुरात उपचार सुरू असताना पप्पू पवार याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात सुरेश पवार यांनी फिर्याद दिली. त्यानुसार हरी केकडे, जुबेर शेख, मिथुन साळवे सह चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेसंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी 3 एप्रिल रोजी वैराग पोलिस ठाण्यास भेट दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news