सोलापूर : भावकी वादातून अंगावर उकळलेले तेल टाकले

crime
crime
Published on
Updated on

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा :  भावकीच्या वादातून शहाजी गोविंद ढवळे (वय 55, रा. सापटणे टें, ता. माढा) यांच्या अंगावर अंगावर उकळलेले तेल टाकण्यात आले. शहाजी हे घरी झोपले असताना रात्री भावकीतील लोकांनी हा प्रकार केला. शहाजी हे भाजून गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संतोष राजेंद्र ढवळे (वय 30) आणि नरसिंह राजेंद्र ढवळे (वय 32, दोघे रा. सापटणे टें , ता. माढा) यांच्याविरुध्द टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहाजी व संतोष , नरसिंह ढवळे यांच्यात भावकीत काही कारणांवरून वाद सुरू आहे. या वादाचे पर्यवसान नेहमीच हातघाईवर येत असे. दरम्यान सोमवारी (दि. 6 जून) मध्यरात्रीच्या सुमारास शहाजी ढवळे हे घरामध्ये झोपले होते. त्यावेळी त्यांच्या भावकीतील संतोष ढवळे व नरसिंह ढवळे या दोघांनी याच कारणातून त्यांच्या अंगावर गरम उकळलेले तेल टाकून पळ काढला. यामध्ये शहाजी यांच्या तोंडावर, छातीवर, पोटावर, पायावर, मांडीवर अंगावर उकळते तेल पडल्याने ते भाजून ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक ओमासे पुढील तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news