सोलापूर : पोलीस आणि गणेश भक्तांमध्ये डॉल्बीच्या आवाजावरून वाद

सोलापूर : पोलीस आणि गणेश भक्तांमध्ये डॉल्बीच्या आवाजावरून वाद
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : लष्कर गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ मिरवणुकी दरम्यान डॉल्बीचा आवाज जास्त असल्याने पोलिसांनी डॉल्बीच्या पीना काढून नेल्या. त्यामुळे संतापलेल्या भक्तांनी मिरवणुका आहे त्या जागेवर थांबवल्या. यामूळे वातावरण तणावपूर्ण बनले. मात्र मध्यवर्तीच्या ज्येष्ठ संस्थापक सदस्यांनी समाजावत मिरवणूक मार्गस्थ केली.

सकाळी नऊ वाजता मानाच्या गणपतीची पूजा झाल्यानंतर लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक मार्गस्थ झाली. दरम्यान ही मिरवणूक लष्कर चौकात आली होती. या ठिकाणी डॉल्बीचा जोरजोरात आवाज सुरू होता. सदर बजार पोलीस ठाण्याचे पोलिस बंदोबस्ताला होते. पोलिसांना आवाजाची मर्यादा जास्त वाटल्याने त्यांनी कमी करण्यास सांगितले परंतु कुणी ऐकले नाही शेवटी पोलिसांनी साऊंड सिस्टिमच्या पिना काढल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

पोलीस आणि मिरवणुकीतील सहभागी झालेल्या भक्तांमध्ये वाद सुरू झाले. यानंतर भक्तांनी ठिय्या मांडला. लष्कर मध्यवर्तीचे संस्थापक सदस्य प्रकाश पारसवार, देवेंद्र भंडारे यांच्यासह इतर पदाधिका-यांनी गणेश भक्‍त व पोलिसांना समाजावत वाद मिटवला. आजपर्यंत लष्कर मध्यवर्तीच्या मिरवणुकीत कोणताही गोंधळ झाला नाही पोलिसांनी समन्वयाची भूमिका घ्यावी. इतर उत्सवात हस्तक्षेप केला जात नाही मग गणेशोत्सवात का? असा सवाल उपस्‍थित केला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news