सुप्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन देणार वर्षभर मनपा शिक्षकांना संगीताचे धडे

सुप्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन देणार वर्षभर मनपा शिक्षकांना संगीताचे धडे
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड निर्माण करून त्यांतून चांगले वादक, गायक, संगीतकार तयार व्हावेत, यासाठी लवकरच मनपा शिक्षकांना संगीताचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी सुप्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन यांच्याशी बोलणीदेखील झाली आहे. त्यांनी तयारीदेखील दर्शविली आहे. वर्षभर मनपा शिक्षकांना ते संगीताचे प्रशिक्षण देतील, अशी माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.

आपल्या अवीट गाण्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवणारे व संगीताच्या तालावर डोलायला लावणारे सुप्रसिद्ध भारतीय संगीतकार व गायक शंकर महादेवन हे सामाजिक बांधिलकी जोपासून संगीत व गायनामध्ये आवड असलेल्या गरीब शाळकरी मुलांना संगीताचे मोफत धडे देतात. याबद्दलची माहिती घेऊन प्रशासक जी. श्रीकांत यांनी शंकर महादेवन यांच्याशी संपर्क साधून महापालिकेतील शिक्षकांना संगीताचे धडे देण्याची विनंती केली. त्यांची ही विनंती महादेवन यांनी मान्य केली. मनपाच्या प्रत्येक शाळेत संगीताचा वर्ग सुरू केला जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना संगीताचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यातून त्यांना करीअर करता यावे, यासाठी प्रशासक जी. श्रीकांत यांनी ही नवीन संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची तयारी शंकर महादेवन यांनी दाखवली आहे. त्यामुळे आता संगीताची आवड असलेल्या विद्यार्थ्यांमधील गुण ओळखून त्यांना वादक, गायक, संगीतकार करणे, त्यांना या विविध वाद्यांचे प्रशिक्षण देण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. तर शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम शंकर महादेवन हे करणार आहेत.

शिक्षकांची बैठक घेणार

मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून संगीताचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने शिक्षण विभागाची लवकरच बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत संगीताची आवड असलेल्या शिक्षकांना आपआपल्या शाळेत संगीताचे वर्ग सुरू करण्याचे सांगण्यात येईल. संगीताचे वर्ग सुरू करण्यासाठी लागणारे साहित्य सीएसआर निधीतून खरेदी केले जाईल, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

शंकर महादेवन

शंकर महादेवन हे भारतीय संगीतकार व गायक आहेत. त्यांनी तमिळ, हिंदी, मराठी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन व गायन केले आहे. भारतीय चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय या त्रिकुटाचा ते एक सदस्य आहेत. महादेवन यांचे हिंदुस्तानी संगीतात प्रशिक्षण झाले आहे. त्यांनी मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. अगं बाई अरेच्या ! मधील ममन उधाण वाऱ्याचेफ या गाण्याद्वारे मराठी चित्रपटात त्यांनी ठसा उमटवला. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील मसूर निरागस हो, फ हे गाणेसुद्धा त्यांनी गायिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news