सुपर कॉम्प्युटर ‘परम अनंत’

सुपर कॉम्प्युटर ‘परम अनंत’
Published on
Updated on

गांधीनगर : एका सेकंदातच 838 लाख कोटी गणना करण्यात सक्षम असलेला भारताचा सुपरकॉम्प्युटर 'परम अनंत' सरकारने आयआयटी गांधीनगरमध्ये स्थापित केला आहे. हा स्वदेशी सुपरकॉम्प्युटर 838 टेराफ्लॉप्सच्या क्षमतेने सुसज्ज आहे. सोमवारी हा सुपरकॉम्प्युटर देशाला समर्पित करण्यात आला.

राष्ट्रीय सुपर कम्प्युटिंग मिशन (एनएसएम) च्या दुसर्‍या टप्प्यांतर्गत 'परम अनंत'ची आयआयटी गांधीनगरमध्ये स्थापना करण्यात आली. हा सुपर कॉम्प्युटर बनवण्यासाठीची बहुतांश उपकरणे भारतातच 'मेक इन इंडिया'च्या अंतर्गत बनवण्यात आली आहेत. या सुपर कॉम्प्युटरमध्ये अ‍ॅडव्हान्स कम्प्युटिंग डेव्हलपमेंट सेंटर (सी-डॅक) द्वारे विकसित स्वदेशी सॉफ्टवेअर स्टॅकचा वापर करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयातील समूह समन्वयक तसेच वैज्ञानिक सुनीता वर्मा यांनी म्हटले आहे की 'परम अनंत'च्या 60 टक्के क्षमतेचा वापर आयआयटी गांधीनगरमध्ये केला जाईल. अन्य क्षमता वेगवेगळ्या संशोधन कार्यासाठी शैक्षणिक संस्थांसाठी उपलब्ध असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news