मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या आई मीनल यांचे रविवारी सकाळी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९५ वर्षांच्या होत्या.
मीनल गावसकर या गेल्या वर्षभरापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होत्या. या वर्षाच्या सुरुवातीला आयपीएलसाठी कॉमेंट्री करणाऱ्या गावसकरांना आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी त्यावेळी बायो- बबलमधून बाहेर पडावे लागले होते. गावसकर सध्या बांगलादेशमध्ये आहेत. ढाका येथे सोमवारी संपलेल्या भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ते समालोचक म्हणून कार्यरत होते. आईच्या निधनाची बातमी समजली तरी त्यांनी कॉमेंट्री थांबवली नाही..