सियाचीन हॉस्पिटल दै. ‘पुढारी’ का बहुत बडा कार्य : विजय देवांगण

कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्राचे सहसंपर्कप्रमुख विजय देवांगण यांनी दै. ‘पुढारी’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक, चेअरमन डॉ. प्रतापसिंह जाधव व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. शेजारी प्रमोद ढोले, प्रशांत गंभीर, संदीप मिरजकर आदी.
कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्राचे सहसंपर्कप्रमुख विजय देवांगण यांनी दै. ‘पुढारी’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक, चेअरमन डॉ. प्रतापसिंह जाधव व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. शेजारी प्रमोद ढोले, प्रशांत गंभीर, संदीप मिरजकर आदी.

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : "सियाचीन हॉस्पिटल दै. 'पुढारी' का बहुत बडा सामाजिक कार्य है", असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्राचे सहसंपर्कप्रमुख विजय देवांगण यांनी काढले. देवांगण पश्चिम महाराष्ट्र दौर्‍यावर असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधत आहेत. सोमवारी त्यांनी दै. 'पुढारी' कार्यालयास सदिच्छा भेट देऊन दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक, चेअरमन डॉ. प्रतापसिंह जाधव व दै. 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

देवांगण म्हणाले, अत्यंत प्रतिकूल ठिकाणी दै. 'पुढारी'ने उभारलेले सियाचीन हॉस्पिटल हे भारतीय जवानांसाठी संजीवनी देणारे आहे. कारण या ठिकाणी उणे 30 ते 40 अंश इतक्या कमी तापमानात भारतीय जवान आपली सेवा बजावत आहेत. त्यांच्यावर आपत्कालीन स्थितीत उपचार करण्यासाठी हे हॉस्पिटल उपयुक्त ठरत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून जनतेचे प्रबोधन करणार्‍या दै. 'पुढारी'ने जनमानसात आपले स्थान निर्माण केले आहे. समाजाला दिशा देण्याचे काम दै. 'पुढारी' आपल्या लेखणीतून करत आहे.

2014 सालापासून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आले. यानंतर देशाच्या विविध क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाला. यातीलच उद्योग, पर्यटन, शिक्षण, शेती या विषयांवर डॉ. योगेश जाधव यांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण लेख हे पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हावेत, अशी अपेक्षा देवांगण यांनी व्यक्त केली.

कोव्हिड काळात राज्यात विविध ठिकाणी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देणारी पुस्तिका डॉ. जाधव यांना भेट दिली. सर्व समाजासाठी संघटनेचे असणारे काम लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी संघटना मजबूत करणार्‍यांबरोबरच जास्तीत जास्त युवकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे देवांगण यांनी सांगितले.

यावेळी शहर संघचालक प्रमोद ढोले, कोल्हापूर विभाग संपर्कप्रमुख प्रशांत गंभीर, कोल्हापूर शहर संपर्कप्रमुख संदीप मिरजकर आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news