सायकल चोरीमुळे अमेरिकेतील शहर त्रस्त

सायकल चोरीमुळे अमेरिकेतील शहर त्रस्त
Published on
Updated on

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : कॅनडा सीमेवरील सुमारे 45 हजार लोकसंख्या असलेले शहर सायकल चोरांमुळे त्रस्त आहे. गेल्या काही महिन्यांत सायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. घरे, गॅरेज आणि बाजारपेठेतून सायकलींची चोरी होत आहे? विद्यार्थ्यांना सायकल चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

येथील एका विद्याठातून जूनपासून आतापर्यंत सुमार 220 सायकली चोरीस गेल्या आहेत. त्यांची किंमत अडीच कोटी रुपयांच्या आसपास आहे. चोरांना पकडण्यासाठी शहरातील लोकांनी सायकलींवर ट्रॅकर आणि घरांमध्ये सीसीसी टीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शहरात सायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. काही जणांनी अन्यत्र बदली करून घेतली आहे. काहींनी नोकरीचा राजीनामा दिला आहे, हे विशेष!

दरम्यान, सायकल चोरीचे अवैध रॅकेट शहरात सुरू असून पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून सायकली जप्त केल्या आहेत; पण सायकल चोरीचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नसल्याने सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news