साताऱ्यात मुलाला बेदम मारहाण, उकळत्या चुन्यात दिले ढकलून

साताऱ्यात मुलाला बेदम मारहाण, उकळत्या चुन्यात दिले ढकलून
Published on
Updated on

सातारा : वृत्तसेवा

साताऱ्यातील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या समाधान मोरे या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे उकळत्या चुन्यात ढकलून या मुलाला नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली आहे.  उकळत्या चुन्यात ढकलून मुलाच्या अंगावर भाजलेल्या जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मारहाण करणारे संशयित हे दारू पिलेले असल्याचे तक्रारदार यांचे सांगणे आहे.

या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने साता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news