सातारा : कोरोनानंतर स्वाईन फ्लूने वाढवले टेन्शन

नागपूर
नागपूर

सातारा : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे संकट असताना आता व्हायरल तापासोबत स्वाईन फ्लूनेही टेन्शन वाढवले आहे. राज्यात अन्यत्र स्वाईन फ्लूचेही रुग्ण आढळून आले असून, भीतिदायक परिस्थिती नसली तरी जिल्ह्यातून काळजीचा सूर निघू लागला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत स्वाईन फ्लूचे 8 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढली असून, जिल्हावासीयांनी दक्षता घेण्याची गरज आहे. स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

सिव्हिलमधील यंत्रणा अलर्ट

कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना आता स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. सिव्हिलमध्ये आतापर्यंत 7 संशयित रुग्णांचे नमुने पुणे एनआयव्ही संस्थेला पाठवण्यात आले असून, त्यातील तीन जण बाधित आढळले आहेत. इतर जिल्ह्यात स्वाईनचे रुग्ण वाढताना दिसत असल्याने जिल्हा रुग्णालय अलर्ट झाले आहे. आरटीपीसीआर लॅबच्या शेजारी स्वाईन फ्लूची स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आली आहे. ही ओपीडी सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहे. सकाळी 9 ते 1 व दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही ओपीडी सुरू राहणार आहे.

स्वाईन फ्लू होण्याची कारणे ….

स्वाईन फ्लूू बाधित व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला याचा संसर्ग होऊ शकतो. बाधित व्यक्तीच्या शिंकेद्वारे किंवा खोकल्यातून क 1 छ1 विषाणू हे हवेत पसरत असतात. ह्या विषाणूंचा व्यक्तीच्या नाक, तोंड, डोळे, त्वचा यांच्याशी संपर्क झाल्यास विषाणूंचे संक्रमण होते व त्या व्यक्तीलाही याची लागण होते. स्वाईन फ्लू बाधित रुग्णाच्या एका शिंकेद्वारे हजारो विषाणू हवेमध्ये पसरून संसर्ग माजवू शकतात. स्वाईन फ्लूचे विषाणू हवेत 8 तास जिवंत राहू शकतात. म्हणून स्वाईन फ्लूला अतिशय संसर्गजन्य आजार असेही संबोधले जाते.

स्वाईन फ्लूची लक्षणे –

स्वाईन फ्लूची लक्षणे ही सामान्य फ्लू सारखीच असतात. ताप येणे, हुडहुडी व थंडी वाजणे, सर्दी येणे, नाक वाहणे, खोकला, घशात दुखणे, अंगदुखी, डोके दुखणे, पोटात दुखणे, अतिसार, मळमळ व उलटी होणे यासारखी लक्षणे स्वाईन फ्लूमध्ये असू शकतात.

इन्फ्लूएंझा टाळण्यासाठी हे करा

वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा. पौष्टिक आहार घ्या. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा. धूम्रपान टाळा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. भरपूर पाणी प्या.

जिल्ह्यात पुरेसा औषध साठा उपलब्ध

१. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व भांडार विभागात टॅमी फ्ल्यू 75 एमजी 17 हजार 13 गोळ्या, टॅम्यूफ्ल्यू 45 एमजी 2 हजार 610 गोळ्या, टॅम्यूफ्ल्यू 30 एमजी 2 हजार 890 गोळ्या, इंजेक्शन 8 हजार 730 व्हाईल्स असा साठा आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्लूूच्या पार्श्वभूमीवर पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे.

२. जिल्ह्यात सातारा 2, कराड 3, खटाव 1, वाई 1 व जावली 1 असे एकूण 8 रुग्ण स्वाईन फ्लूचे असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. सातारा जिल्हा हा मुंबईच्या संपर्कात असल्यामुळे दक्षता घेणे व सर्वेक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

३. जिल्ह्यात इन्फ्लूएंझा एच 1 एन 1 तपासणी करणार्‍या सर्व प्रयोगशाळांना एच 1 एन 1 दूषित नमुने आढळल्यास त्याची त्वरित माहिती संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका आरोग्य अधिकारी, साथरोग शाखेस कळवावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

स्वाईन फ्लू आजारावर काय आहेत उपचार; रुग्णांनी नेमके काय करावे?

* पेशंटमध्ये असणार्‍या लक्षणांनुसार स्वाईन फ्लूवर उपचार केले जातात. यावर उपचारासाठी अँटी-व्हायरल औषधे
दिली जातील.
* यासाठी टॅमी फ्लू औषधे वापरले जातात. रुग्णास ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी असे त्रास होत असल्यास वेदनाशामक औषधे दिली जातात.
* स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. अशा रुग्णांनी पूर्णपणे बरे होईपर्यंत बेडरेस्ट घेणे गरजेचे असते.
श्र पूर्णपणे बरे होईपर्यंत इतर लोकांना आपल्यामुळे याची लागण होणार नाही याचीही रुग्णांनी काळजी घ्यावी.
* शरीरात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून ओआरएस, पाणी व इतर पातळ पदार्थ म्हणजे सूप, फळांचा रस इ. भरपूर प्रमाणात घ्यावे.

रुग्णाला दिला जातो 5 दिवसांचा औषधांचा डोस

स्वाईन फ्लू झालेल्या किंवा संशयित रुग्णांस त्याच्या वजनानुसार पाच दिवसांचा औषधाचा डोस घ्यावा लागतो. हा डोस सकाळी व संध्याकाळी एक गोळी असा असतो. रुग्णाला टॅमी फ्लू गोळी देण्यात येते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. टॅमी फ्लूच्या 75 मिली ग्रॅमच्या 35 हजार गोळ्या, 45 मिली ग्रॅमच्या 35 हजार तर 30 मिली ग्रॅमच्या 20 हजार गोळ्या उपलब्ध आहेत.

स्वाईन फ्लूमुळे जास्त धोका कोणाला

65 वर्षांवरील वयोवृद्ध व्यक्ती, पाच वषार्ंपेक्षा कमी वयाची लहान मुले, गरोदर स्त्रिया, हृदयविकार, डायबेटीस, किडनीचे विकार, अस्थमा पेशंट अशा व्यक्तींमध्ये स्वाईन फ्लूची लागण झाल्यास आजार अधिक गंभीर होऊ शकतो.

2009 पासून स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लू हा एक संसर्गजन्य आजार असून, त्याची लागण ही क1छ1 या व्हायरसपासून होते. स्वाईन फ्लूची लक्षणे ही साधारण फ्लू सारखीच म्हणजे सर्दी होणे, खोकला, ताप येणे अशी असतात. स्वाईन फ्लूचा व्हायरस हा डुकरांमधून माणसाकडे पसरला आहे. 2009 साली पहिल्यांदा स्वाईन फ्लू हा आजार माहीत झाला. जागतिक आरोग्य संघटनेने ऑगस्ट 2010 मध्ये 'स्वाईन फ्लू' ला जागतिक महामारी म्हणून जाहीर केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news