साखर निर्मितीसाठी आता हरित प्रक्रिया तंत्रज्ञान

साखर निर्मितीसाठी आता हरित प्रक्रिया तंत्रज्ञान

राशिवडे : प्रवीण ढोणे : सगळ्यांच्या घरामध्ये वापरली जाणारी साखर आता हरित प्रक्रिया तंत्रज्ञानाने तयार केली जाणार आहे. आतापर्यंत ज्या तंत्रज्ञानाद्वारे साखर तयार केली जात होती, त्यात बरेच पाणी वाया जात होते. 'एनएसआय'ने हरित प्रक्रियेचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यात फॉस्फोरिक अ‍ॅसिड न वापरता 'सीओटू' वापरून साखर तयार केली जाईल. त्यामुळे प्रदूषणावर मात करणे शक्य होणार आहे.

राज्यात सुमारे दोनशे सहकारी, खासगी कारखाने आहेत. बहुतांश कारखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नसल्याने प्रदूषण वाढत आहे. मात्र, या नव्या हरित तंत्रज्ञानामुळे पर्यावरण दूषित होण्यापासून वाचणार आहे.

दुसरीकडे साखर उत्पादनात वाया जाणारे पाणीही वाचणार आहे. पर्यावरण दूषित होण्यापासून वाचण्यासोबतच या तंत्रज्ञानामुळे पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. काही वर्षांत देशातील सर्व साखर रिफायनरीजमध्ये फक्त ग्रीन प्रक्रियेंतर्गत साखर बनवली जाईल. जी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

उसाचा रस काढून साखर तयार केली जात असताना त्या प्रक्रियेत लाखो लिटर पाणी वाया जाते; पण या हिरव्या प्रक्रियेत पाणीही नगण्य असेल. देशात दोन ठिकाणी ग्रीन प्रक्रियेपासून साखर बनविण्याचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दोन रिफायनरींचा समावेश आहे. जिथे हिरव्या प्रक्रियेद्वारे साखर तयार केली जाते. या प्रक्रियेत, फॉस्फोरिक अ‍ॅसिडऐवजी, फक्त सीओटू वापरला गेला आहे. प्रामुख्याने साखर निर्मितीच्या हरित प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाला आळा बसणार आहे. तसेच खर्चिक केमिकलचा खर्चही कमी होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news