सांगली : दहिवडीच्या तरुणाला 20 वर्षे सक्‍तमजुरी

सांगली : दहिवडीच्या तरुणाला 20 वर्षे सक्‍तमजुरी
Published on
Updated on

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संभाजी आनंदराव जाधव (वय 31, रा. दहिवडी, ता. तासगाव) याला वीस वर्षे सक्‍तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे आरती देशपांडे यांनी काम पाहिले. याप्रकरणी पीडित मुलगी फितूर होऊनही आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली.

29 मे 2019 रोजी पीडित आरोपी संभाजी जाधव याने मध्यरात्री पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. दुसर्‍या दिवशी पीडित मुलीने शेजार्‍यांच्या मोबाईलवरून घडलेल्या घटनेबाबतची माहिती बहिणीला दिली. याप्रकरणी पीडित मुलीने तिची बहीण व मावशीच्या समवेत तासगाव पोलिस ठाण्यात जाधव यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक बी. एल. शेळके यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले.

सुनावणीदरम्यान पीडित मुलगी व तिची मावशी उलट तपासादरम्यान फितूर झाली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकार पक्षाला सहायक फौजदार शरद राडे, हवालदार रमा डांगे, वंदना मिसाळ, गणेश वाघ यांनी मदत केली. न्यायालयाने भा.द.वि कलम 376 (3) व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 6 अन्वये दोषी ठरवून संभाजी जाधव याला शिक्षा सुनावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news