सहा महिन्यांनंतर पुनरागमन; तरीही चहरने केला कहर

सहा महिन्यांनंतर पुनरागमन; तरीही चहरने केला कहर

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्याच वन-डे सामन्यात दीपक चहर हिरो ठरला. दुखापतीनंतर तब्बल सहा महिन्यांनी दीपक संघात परतला; पण सहा महिन्यांनी संघात परतल्यावर दीपकने पहिल्याच सामन्यात तीन बळी मिळवत आपण संघासाठी किती फायदेशीर ठरू शकतो, हे त्याने दाखवून दिले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दीपक हा स्विंग गोलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. पुनरागमन करत असताना दीपकने चेंडू चांगले स्विंग केले, त्याचबरोबर त्याचा टप्पा आणि दिशा महत्त्वाची होती. दीपक यावेळी दोन्ही बाजूकडे स्विंग करत असल्याचे पाहायला मिळाले.

दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करत असल्याचा चांगला फायदा यावेळी दीपकला झाला आणि त्याला तीन विकेटस् मिळवता आल्या.
दीपकला आयपीएलपूर्वीच दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. त्यानंतर दीपकने लग्‍न केले, त्यावेळी तो भारताच्या संघात पुनरागमन उशिरा करेल, असे सर्वांना वाटत होते; पण दीपक त्यानंतर काही वेळातच संघात परतला आणि पहिल्या सामन्यात हिरो ठरला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news