मुंबई; पुढारी ऑनलाईन : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने तगडा झटका दिला आहे. त्यांची खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी मागितली होती ती विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यांनी उपचार आता सुरु असलेल्या जेजे रुग्णालयामध्येच उपचार सुरु ठेवावेत असे आदेश न्यायालयाने दिले.
१०० कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेल्या अनिल देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल करत घरातील जेवण तसेच खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी मागितली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही.
देशमुखांनी खांद्याला झालेल्या दुखापतीवर शस्त्रक्रिया जेजे रुग्णालयात न करता खासगीमध्ये करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यांच्या या मागणीला ईडीने जोरदार विरोध केला होता. खासगी रूग्णालयात तातडीने उपचारांची गरज नाही, जेजेमध्ये हे उपचार होऊ शकतात असे जेजेमधील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना विशेष न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने त्यांना खासगी न्यायालयात उपचार घेण्यासाठी परवानगी दिली आहे. यापूर्वीच मलिकांनी न्यायालयाला सांगितले होते की, राज्य संचालित रुग्णालयात योग्य उपचार केला जात नाही, त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार करण्याची मागणी केलेली होती.
विशेष न्यायालय पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिलेली आहे. मलिक न्यायालयात ताप आणि डायरियामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मलिकांविरोधात ५००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
हे ही वाचलं का ?