संजय राऊत म्हणाले, पाडापाडीची भाषा करून चंद्रकांत पाटील स्वतःच पडले

संजय राऊत
संजय राऊत

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : जपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सरकार पडण्याच्या तारखांवर तारखा देत आहेत. पण सरकार पडत नाही. पाडापाडीची भाषा करीत ते स्वत:च पडले आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी रविवारी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

चंद्रकांत पाटील यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील सरकार पडेल, असे भाकीत केले होते. त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

शिवसेना भवनमध्ये उद्या सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ही पत्रकार परिषद संजय राऊत यांची नसून शिवसेनेची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेबरोबरच महाविकास आघाडीचे नेतेसुद्धा पत्रकार परिषद घेतील. तोपर्यंत तुम्हाला जेवढ्या फाईल बाहेर काढायच्या आहेत तेवढ्या बाहेर काढा, असे आव्हानही राऊत यांनी किरीट सोमय्या आणि भाजपला दिले.

भुंकताहेत त्यांना भुंकू द्या

सोमय्या यांचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, कोव्हिड सेंटर्समध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. पण काही लोक भुंकत असतात, त्यांना भुंकू द्या. तुम्हाला काय फायली काढायच्या तेवढ्या बाहेर काढा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news