संगमनेर : रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीचा भावाला राखी बांधण्याच्या आतच अपघाती मृत्यू

संगमनेर : रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीचा भावाला राखी बांधण्याच्या आतच अपघाती मृत्यू

Published on

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा: संगमनेर तालुक्यातील कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील डेरेवाडी फाट्याजवळ अकोले तालुक्यातील तांबोळ येथील संदीप खंडू माने (वय 38), भरत बाबुराव कराळे (वय 56, रा.दोघेही तांभोळ) मोटरसायकल स्वरांचा जागीच मृत्यू झाला तर पुण्याहून माहेरी रक्षाबंधनानिमित्त आलेल्या बहिणीचा भावाला राखी बांधण्याच्या आतच नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाट्यावर मालट्रकने दिलेल्या धडकेमध्ये रुपाली बाळासाहेब कुडे कर (वय 29, रा.पुणे मूळ गाव मोधळवाडी, ता.संगमनेर) दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यामुळे संगमनेर तालुक्यातील मोदळवाडी आणि अकोले तालुक्यातील तांबोळ गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पहिल्या घटनेमध्ये कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील डेरेवाडी फाट्याजवळून दुचाकी क्र.एम.एच .17/बी.एच.2240) संगमनेरहून अकोल्याच्या दिशेने जात असलेल्या संदीप खंडू माने (वय 38) व भरत बाबुराव कराळे (वय 56, रा.दोघेही तांभोळ) यांच्या दुचाकीला अकोल्याकडून संगमनेरकडे येत असलेल्या महिंद्रा पिकअप (क्र.एम.एच.15/एफ.व्ही.9434) हीने समोरुन जोराची धडक दिली असता झालेल्या अपघातामध्ये मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा होऊन दोघांचाही दुर्दैवी जागीच मृत्यू झाला.

याबाबत देवराम बाबुराव माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी पिकअप चालक कैलास नामदेव सदगीर (वय 25, रा.मुथाळणे, ता. अकोले) याच्या विरोधात सदोष मनुष्यवधासह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news