श्रीनगरात नळांचे पाणी गोठले; उणे साडेसहा अंश तापमान

श्रीनगरात नळांचे पाणी गोठले; उणे साडेसहा अंश तापमान
Published on
Updated on

श्रीनगर, वृत्तसंस्था : जम्मू आणि काश्मिरात थंडीची लाट भीषण झाली असून राजधानी श्रीनगरमध्ये तापमान उणे ६.४ इतके खाली गेले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या नळांतले पाणी गोठले असून जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार यंदाच्या हिवाळ्यात काश्मिरात आलेली थंडीची लाट काहीशी वेगळी आहे. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने काश्मिरात तापमान खाली जाते; पण यंदा झपाट्याने ते खाली गेले आहे. ३१ जानेवारीला आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे उणे ८.८ तापमान दोन वर्षांपूर्वी नोंदले गेले होते; पण यंदा दोन जानेवारीलाच श्रीनगरने उणे ५.४ तापमान नोंदवले. गुरुवारी श्रीनगरचे तापमान ६.४ झाले असून पाण्याचे नळही गोठले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news