शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर आज निर्णय?

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर आज निर्णय?
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्रात गेल्या काळात अनपेक्षितरीत्या घडलेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होऊ घातलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी पक्षाचे 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार की शिंदे गटाला मिळणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

उद्या, शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यासंबंधीचा निर्णय देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दिलेली मुदत 7 ऑक्टोबरला संपत आहे. त्यामुळे पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत महत्त्वाचा निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news