’शिवरायांनी वापरलेली वाघनखे परत आणणार’

’शिवरायांनी वापरलेली वाघनखे परत आणणार’

Published on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : जगदंबा तलवारीपाठोपाठ आता छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत आणणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या घोषणेमुळे राज्यातील तमाम शिवप्रेमींनी तसेच इतिहास संशोधकांनी आनंद व्यक्त केला आहे.

शिवराज्याभिषेक दिनाला २०२४ साली ३५० वर्षे पूर्ण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ६ जून २०२४ हा संकल्प आणि शपथ दिवस असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. शिवरायांनी वापरलेले वाघनखे पुन्हा मिळावीत यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी माहिती दिली. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी वाघनखे राज्यात आणण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. शिवरायांनी वापरलेली ही वाघनखे सध्या ब्रिटनमध्ये आहेत. त्याचबरोबर शिवरायांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news