शिंदे गटातील ९ कॅबिनेट मंत्र्यांची बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट

शिंदे गटातील ९ कॅबिनेट मंत्र्यांची बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शिंदे गटातील कॅबिनेट पदाची शपथ घेतलेल्या ९ मंत्र्यांनी आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. मंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी बाळासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याच्या भावना यावेळी मंत्र्यांनी व्यक्त केली.

दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर आता खातेवाटपाची प्रतीक्षा असून भाजप आणि शिंदे गट यांच्यात कोणकोणती खाती विभागली जाणार याबद्दल उत्सुकता आहे. शिंदे गटातील ९ मंत्र्यांनी आज पदभार स्वीकारण्यापूर्वी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. यावेळी सर्वांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. यामध्ये गुलाबराव पाटील, दादा भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड, शंभूराज देसाई यांचा समावेश होता. यावेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news