शासकीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ

शासकीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ
Published on
Updated on

मुंबई : राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्के करण्यात आला आहे. महागाई भत्त्यातील ही चार टक्क्यांची वाढ 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात आली आहे. वित्त विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.

1 जुलै ते 31 डिसेंबर 2022 या काळातील हा वाढीव महागाई भत्ता जानेवारी 2023 या महिन्याच्या वेतनासोबत रोखीने दिला जाणार असल्याचेही या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यासोबतच, अद्याप सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन घेणार्‍यांच्या महागाई वाढीचा दर 203 टक्क्यांवरून 212 टक्के करण्यात आला आहे. तसेच, ही महागाई वाढसुद्धा जानेवारी 2023 च्या निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news