वॉशिंग्टन : दोन तार्‍यांच्या धडकेने अंतराळात बनला डोळा

वॉशिंग्टन : दोन तार्‍यांच्या धडकेने अंतराळात बनला डोळा
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अंतराळात उच्च घनत्व असलेले दोन तारे एकमेकांवर धडकले. याबरोबरच त्यांच्यात रहस्यमयी शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटाच्या केंद्रस्थानी मानवी डोळ्यासारख्या अत्यंत चमकदार आकृतीची निर्मिती झाली.

अंतराळात  तार्‍यांच्या या धडकेस खगोल शास्त्रज्ञांनी 'किलोनोवा' असे नाव दिले. हे किलोनोवा असले तरी ही एक ऐतिहासिक अवकाशीय घटना आहे. सर्वसामान्यपणे किलोनोवा स्फोट हा दोन 'हायपर-डेन्स न्यूट्रॉन' तारे एकमेकांवर आदळल्याने होतो. तर न्यूट्रॉन तारे हे सुपरनोव्हा स्फोटामुळे बनतात. तर दोन तार्‍यांनी एकमेकांना धडक दिल्याने होणार्‍या शक्तिशाली स्फोटाला 'सुपरनोव्हा' असे म्हणतात. अथवा एखाद्या तार्‍याचा स्फोट होणे, यास सुपरनोव्हा असे म्हणतात.

शास्त्रज्ञांनी किलीनोवा स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात क्ष-किरणे बाहेर पडताना पाहिली. यास ॠथ170817 असे नाव देण्यात आले आहे. या स्फोटाचा शोध लावणार्‍या शास्त्रज्ञांच्या पथकाने सांगितले की, या स्फोटातून बाहेर पडलेला कचरा संपूर्ण अंतराळात पसरला आहे. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे व संशोधनाचे प्रमुख संशोधक अपराजिता हॅजेला यांनी सांगितले की, अंतराळात आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो होतो, ज्या ठिकाणची कसलीच माहिती नव्हती. तेथे दोन न्यूट्रॉन स्टार एकमेकांवर आदळल्याने झालेली धडक पाहिली. ही प्रक्रिया समजण्यासाठी आम्ही संशोधन करत आहोत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news