वाढलेले प्रोस्टेट आणि मूत्र विसर्जन समस्या

वाढलेले प्रोस्टेट आणि मूत्र विसर्जन समस्या
Published on
Updated on

बीपीएच अर्थात (Benign prostatic hyperplasia) सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासिया – हे वाढलेल्या प्रोस्टेट चे वैद्यकीय नाव आहे. हा एक वाढत्या वयाशी संबंधित आजार असून बरेचदा याचे कारण हार्मोनलबदल हेदेखील असू शकते. बीपीएचचे स्वरूप सौम्य असते. याचा अर्थ हा कर्करोग नाही; पण बीपीएच आणि कर्करोग एकाच वेळी होऊ शकतात. बीपीएचची लक्षणे व्यक्तीनुसार बदलू शकतात.

वाढलेल्या प्रोस्टेटशी संबंधित अस्वस्थता आणि क्लिष्टता कालांतराने विकसित होणार्‍या समस्यांशी संबंधित आहेत. तीन घटक आहेत जे बीपीएच विकसित होण्याचा धोका वाढवू शकतात.

* वृद्धत्व, * कौटुंबिक इतिहास – जर रक्ताच्या नात्यातील कोणत्याही नातेवाईकास बीपीएचचे निदान झाले असेल तर संबंधित व्यक्तीला बीपीएच होण्याच धोका अधिक असतो., * वैद्यकीय परिस्थिती – काही संशोधनानुसार लठ्ठपणा हा बीपीएचच्या विकासास कारणीभूत ठरू शकतो.

वयोमानानुसार प्रोस्टेट दोन मुख्य वाढीच्या टप्प्यातून जातो. पहिल्या टप्प्यात जेव्हा तारुण्याच्या सुरुवातीला प्रोस्टेट आकारात दुप्पट होतो आणि वाढीचा दुसरा टप्पा वयाच्या 25 च्या सुमारास सुरू होतो आणि बहुतेक तो उर्वरित आयुष्यात सुरू राहतो. बीपीएच बर्‍याचवेळा दुसर्‍या वाढीच्या टप्प्यासह उद्भवते. जेव्हा प्रोस्टेट विस्तारलेले असते.

हे मूत्राशयाला त्रास देऊ शकते, ज्यामुळे लोअर युरिनरी ट्रॅक्ट सीमटम्स (एलयूटीएस) समाविष्ट होतात ज्यात वारंवार लघवी होणे, मूत्राशय रिकामे झाल्यानंतरही पूर्ण भरले आहे असे वाटणे, लघवीचा कमकुवत प्रवाह, लघवीला सुरुवात करणे आणि थांबविणे आवश्यक वाटणे, लघवीला सुरुवात करण्यास त्रास, ताण इ. बाबी जाणवतात. या लक्षणांचा सामना करण्यासाठी, रुग्ण पाणी आणि इतर द्रवपदार्थांचे सेवन कमी प्रमाणात सेवन करतात आणि लघवीबद्दल अधिकच सतर्क राहतात.

पण ही एक अतिशय सामान्य स्थिती आहे. 50 ते 60 वयोगटातील सर्व पुरुषांपैकी अर्ध्या पुरुषांमध्ये ही परिस्थिती विकसित होतील आणि 80 वर्षांच्या वयात सुमारे 90 टक्के पुरुषांना बीपीएच असेल. जास्त प्रमाणात असे आढळत असूनसुद्धा रुग्णांना याबद्दल माहिती नसते कारण ते याला वृद्धत्वाची एक सामान्य स्थिती मानतात.

जेव्हा शौचालयाच्या फेर्‍या अचानक वाढतात आणि ही वाढ हळूहळू न होता अचानक होते तेव्हा आपल्याला कुठला आजार आहे का म्हणून रुग्ण डॉक्टरकडे येतात. बहुतेक लोकांमध्ये अशीच सुरुवात झालेली दिसून येते.

बीपीएच आणि प्रोस्टेट कर्करोग यांच्यात कोणताही संबंध नाही. परंतु, तपासणीत डॉक्टरांनी लक्षणांचे कारण शोधणे महत्त्वाचे आहे. अनेकदा, पुरुष आपल्या लक्षणांवर मार्ग शोधण्याऐवजी ती लक्षणे सामावून घेण्यासाठी त्यांचे दैनंदिन दिनक्रम बदलतात.

आपली लक्षणे सौम्य, मध्यम किंवा गंभीर असोत. परंतु, टाळाटाळ न करता आपण आपल्या लक्षणांवर योग्य उपचार घेण्यासाठी डॉक्टरांची भेट घ्यावी. बीपीएचसाठी अनेक उपचार आहेत. कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे हे तुम्ही आणि तुमचे डॉक्टर मिळून ठरवू शकता. बहुतेकदा, बीपीएचला औषधांऐवजी फक्त सक्रिय राहून लक्ष ठेवण्याची आवश्यकता असू शकते. जीवनशैली व्यवस्थापनाची साधी तंत्रेदेखील उपयोगी ठरू शकतात.

साधी तंत्रे

* सक्रिय राहा – निष्क्रिय राहण्यामुळे तुमचे मूत्राशय रिकामे होण्यास समस्या निर्माण होऊ शकते. म्हणूनच शौचालयामध्ये गेल्यावर मूत्राशय रिकामे करण्याचा प्रयत्न करा.

* दररोज वेळापत्रकानुसार लघवी करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला जावे लागेल असे वाटत असो किंवा नसो, रात्री लघवीला जाणे टाळण्यासाठी रात्री 8 नंतर द्रवपदार्थ पिणे थांबवा.

* मद्य पिणे मर्यादित करा.

* काहीवेळा प्रोस्टेट वाढल्याने लघवी थांबू शकते आणि मूत्रपिंड निकामी होण्यासारख्या वाईट समस्या उद्भवू शकतात. यासाठी त्वरित उपचार आवश्यक आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news