वर्षातून दोनवेळा इंजेक्शन घेतल्यास घटणार कोलेस्ट्रॉल

वर्षातून दोनवेळा इंजेक्शन घेतल्यास घटणार कोलेस्ट्रॉल

लंडन : आता भविष्यात वाढलेले 'कोलेस्ट्रॉल' घटविण्यासाठी वारंवार 'स्टेटिन्स' हे औषध घेण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करण्यासाठी आता इंजेक्शनच्या रूपात औषध विकसित करण्यात आले आहे. या औषधाला 'इक्‍लिसिरेन' असे नाव देण्यात आले आहे. हे इंजेक्शन वर्षातून दोनवेळा घ्यावे लागणार आहे. यूकेच्या 'हेल्थ एजन्सी'च्या तज्ज्ञांनी हे औषध 'गेम चेंजिंग ट्रीटमेंट' म्हणजे मोठा बदल घडवून आणणारा उपचार असल्याचे म्हटले आहे.

कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमके काय, हेसुद्धा समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. हा एक शरीरात तयार होणारा चर्बीचा चिपचिपा पदार्थ आहे, जो रक्‍तवाहिन्यांमध्ये एकत्र होत असतो. तो संथपणे एकत्र होतो.

पण हार्ट अ‍ॅटॅक, स्ट्रोक आणि रक्‍तवाहिन्या डॅमेज होण्याचे कारण बनतो. शास्त्रीय भाषेत यास 'एलडीएल कोलेस्ट्रॉल' असेही म्हटले जाते. यावरच नियंत्रण मिळविण्यासाठी आता इंजेक्शनच्या रूपात 'इक्‍लिसिरेन' हे औषध प्रत्येक सहा महिन्यांनी म्हणजे वर्षातून दोन वेळा घ्यावे लागणार आहे.

'इक्‍लिसिरेन' नामक इंजेक्शन घेतल्यानंतर रुग्णाच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण 50 टक्क्यांनी घटणार आहे. आरोग्य सचिव साजिद जाविद यांच्या मते, ही एक 'लाईफ सेव्हिंग ट्रीटमेंट' आहे. यामुळे हृदयासंबंधीच्या आजारांचा धोका कमी होणार आहे.

इक्‍लिसिरेन हे स्टेटिन्सपेक्षाही जास्त प्रभावी आहे. नव्या इंजेक्शनमुळे सुरुवातीला 30 हजार लोकांना वाचविले जाऊ शकते. याचा लाभ पहिल्यांदा इंग्लंडमधील तीन लाख लोकांना मिळेल. मात्र, एका इंजेक्शनची किंमत 2 लाख रुपये असणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news