वन्यजीव छायाचित्रकार मंगेश देसाई यांचा गौरव

वन्यजीव छायाचित्रकार मंगेश देसाई यांचा गौरव

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धेत येथील वन्यजीव फोटोग्राफर मंगेश देसाई यांनी टिपलेल्या छायाचित्राला विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. जगभरातील अनेक फोटोग्राफर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते.

'नेचर इन फोकस' संस्थेच्या माध्यमातून जागतिक फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जगभरातील विविध देशांतील अनेक छायाचित्रकारांनी सहभाग नोंदविला होता. अ‍ॅनिमल बिहेव्हीअर या कॅटेगरीमध्ये कोल्हापूरचे वन्यजीव छायाचित्रकार व 'गो-वाईल्ड' संस्थेचे संस्थापक मंगेश रत्नाकर देसाई यांनी टिपलेल्या छायाचित्राला विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराने कोल्हापूरचे नाव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर झळकले आहे.

गतवर्षी 'बीबीसी'च्या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. यापूर्वीही मंगेश देसाई यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गो-वाईल्ड संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण, वन्यजीव जतन-संवर्धन-संरक्षणा संदर्भातील जनजागृतीचे कार्य गेल्या अनेक त्यांनी अखंड सुरू ठेवले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news