सेरोटोनिन आणि डोपामाईन ही दोन महत्त्वाची न्यूरोट्रान्समीटर आहेत; जे कमी झाल्यावर लहान मुलांमधील तणाव निर्माण करू शकतात. पालक या नात्याने, तुम्हीही मुलाच्या चिंतेचे कारण असू शकता. जर तुम्ही चिंताग्रस्त असाल तर मूलदेखील चिंताग्रस्त होऊ शकते. जर तुम्ही मुलाच्या आजूबाजूला असता तेव्हा तुम्हाला चिंता वाटत असेल तर तो/ती देखील तसे करेल.
शिवाय अपघात, मृत्यू, एखाद्या प्रिय व्यक्तीचे नुकसान, कोणतेही आरोग्यविषयक संकट, घटस्फोट किंवा मुलांवरील हिंसाचार यांसारख्या कोणत्याही क्लेशकारक घटना यादेखील लहान मुलांमधील तणाव वाढवू शकतात.
धमकावणे, लज्जास्पद वागणूक देणे, पालकांशी वाद घालणे, वारंवार शाळा आणि घरे बदलणे किंवा गैरवर्तन करणे यामुळेही मुलांमध्ये चिंता निर्माण होऊ शकते.
मुलांमधील तणावाची लक्षणे जाणून घ्या :
तीव्र हृदय गती, श्वासोच्छ्वासाचा त्रास, थरथरणे, थकवा, घाम येणे आणि स्नायुदुखी ही शारीरिक लक्षणे लक्षात येऊ शकतात. बोलण्यात समस्या, चिडचिड, निराशा, एकटेपणा, एकाग्रता नसणे, शाळेत जाण्यास नकार देणे आणि असभ्य वर्तन, तणाव, काळजी, भीती आणि चिंताग्रस्त असणे ही भावनात्मक लक्षणे दिसू शकतात.
उपाय :
1. समुपदेशन : पालक या नात्याने तुम्हाला मुलाच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे आणि चिंतेच्या कारणांबद्दल जाणून घेण्यासाठी समुपदेशनाची निवड करणे आवश्यक आहे.
2. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) : ही थेरपी मुलाला त्याचे/तिचे वर्तन अधिक चांगल्या प्रकारे बदलून चिंता व्यवस्थापित करण्यास अनुमती देऊ शकते.
3. औषधोपचार : जेव्हा त्याला/तिला सतत आणि गंभीर चिंता सतावत असते, लक्षात ऐण्यासारखे बदल जाणवतात, जी थेरपी घेतल्यानंतरही व्यवस्थापित करता येत नाहीत, तेव्हा तज्ज्ञांकडून त्याला काही औषधे लिहून दिली जातात. ही औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
मुलांमधील चिंता कमी करण्यासाठी टिप्स –
तुमच्या मुलांना भरपूर प्रेम द्या. पालकांनी मुलासमोर शांत आणि संयमी असण्याची गरज आहे. कारण, ते तुमच्याकडूनच शिकतात. तुमच्या मुलाला तणाव किंवा काळजी करण्याऐवजी समस्या सोडवायला शिकवा. हिंसक वर्तन, परिस्थिती किंवा वस्तूंची भीती बाळगण्यापासून परावृत्त करा आणि त्यांच्या समस्या वेळेवरच सोडवा. मुलांसाठी थोडा वेळ घालवा. नेहमी संवाद साधा. त्यांना आवडतील अशा काही गोष्टी करण्यात त्यांना मदत करा. खेळ खेळणे, नृत्य करणे, स्वयंपाक करणे किंवा बागकाम करणे अशा साध्या गोष्टी शक्य आहेत. मुलांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, त्यांना विश्रांतीसाठी सुट्टीवर घेऊन जा, त्यामुळे ते नक्कीच बरे होतील.
डॉ. अतुल पालवे