राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना जामीन

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना जामीन

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : शिगाव (ता. वाळवा) येथील एका प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात माजी जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन घेण्यासाठी शुक्रवारी आ. जयंत पाटील स्वत: न्यायालयात हजर होते.

सन 2018 साली जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादातून शिगाव (ता. वाळवा) येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्यात वाद झाला होता. जमावबंदीच्या आदेशाचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये आ. जयंत पाटील, स्व. विलासराव शिंदे यांच्यासह अन्य 9 जणांचा समावेश होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र येथील न्यायालयात दाखल झाले आहे.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चंडोलीया यांच्यासमोर याची सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी न्यायालयाने आ. पाटील यांना समन्स काढले होते. शुक्रवारी आ. पाटील हे न्यायालयात हजर झाले. संदीप माने हे आ. पाटील यांना जामीन झाले. तर अ‍ॅड. आर. डी. कोपर्डे व अ‍ॅड. विजय काईंगडे यांनी वकीलपत्र दिले. न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. खटल्याची पुढील सुनावणी सप्टेंबर महिन्यात होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news