राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले साईबाबांचे दर्शन
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी (दि. 7) साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रपतींनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतल्यानंतर साईबाबा वस्तुसंग्रहालयास भेट दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंदिरात आगमन झाल्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे साईबाबा मंदिरात आगमन झाल्यावर प्रथम त्यांनी 'द्वारकामाई'चे दर्शन घेतले.

त्यानंतर साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेत पाद्यपूजा व आरती केली. समाधी मंदिर दर्शनानंतर गुरूस्थान मंदीर येथील निंबवृक्षास प्रदक्षिणा मारली. साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या वस्तू ठेवण्यात आलेल्या साईबाबा वस्तुसंग्रहालयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भेट दिली. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवा शंकर यांनी त्यांना वस्तुसंग्रहालयातील वस्तू आणि प्रतिमांविषयी माहिती दिली. साईबाबा मंदीर दर्शन झाल्यानंतर साईबाबा प्रसादालयात राष्ट्रपतींनी प्रसादाचा आस्वाद घेतला. राष्ट्रपतींच्या
साधेपणाचे भाविकांना कौतुक वाटले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news