राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-मनपसंत खरेदी करण्याचा योग संभवतो, लोकांना सहकार्य कराल, सज्जनांच्या सहवासाने मन प्रसन्न होईल, मेजवानीचा आनंद घ्याल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-कोणतीही गोष्ट अति करू नका, अनावश्यक खर्च टाळा, कर्तव्यदक्ष राहा, प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. देणेकरी तगादा लावतील, मनःस्थिती बिघडेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-लाभदायक दिवस, दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल, प्रियजनांचा सहवास लाभेल, छोटे प्रवास घडतील, वैवाहिक सौख्य उत्तम राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-प्रतिष्ठा वाढवणार्या घटना घडतील, सेवाकार्य घडेल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मनःस्वास्थ्य व शारीरिक आरोग्य उत्तम राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा, सरकारी कामांत अडचणी येतील, मनःस्ताप होण्याची शक्यता आहे, नियमांचे उल्लंघन नको.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-दोन्ही बाजू समजून निर्णय घ्यावा, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, मनाविरुद्ध घटना घडतील, उष्णतेचे व श्वसनासंबंधित विकार होण्याची संभावना.[/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-गृहसौख्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस, प्रेम-प्रकरणांत यश मिळेल, प्रलंबित कामे मार्गी लागतील, नियोजनबद्धतेमुळे कामांना गती मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-शत्रूंवर विजय प्राप्त कराल, थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल, आर्थिक लाभ होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- मागील गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे, अतिसाहस करू नका, कामांचे नियोजन आवश्यक आहे, मानपमानाचे प्रसंग निर्माण होतील. संयम आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-वाद-विवादापासून दूर राहा. अनावश्यक खर्च उभे राहतील, कौटुंबिक कलह टाळण्याचा प्रयत्न करावा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-कला-गुणांना वाव मिळेल, लेखकांना लाभदायक दिवस ठरेल, व्यावसायिक प्रगती होईल, साहसाने अशक्य कामे पूर्ण होतील. आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. दिवस आतिथ्यामध्ये जाईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. मनाविरुद्ध घटना घडतील, वाणीवर नियंत्रण आवश्यक.[/box]