राज्यातील रक्तसाठा एका क्लिकवर

राज्यातील रक्तसाठा एका क्लिकवर

कोल्हापूर; एकनाथ नाईक : रुग्णांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अ‍ॅनिमिया, डेंग्यू , रक्तस्त्राव यासह विविध प्रकारच्या आजारांसाठी रक्ताची गरज भासते. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागते. कधी-कधी रक्तासाठा असूनही रक्त देण्यास टाळाटाळ करण्यात येते. त्यामुळे रुग्णांना रक्त अत्यावश्यक असतानाही मिळत नाही. यामुळे महाराष्ट्र शासनाने ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिलची वेबसाईट तयार केली आहे. या साईटवरून राज्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा एका क्लिकवर मिळू लागला आहे.

htt/mahadbtc.crg ही वेबसाईट असून त्यावर फाईंड ब्लड या ऑप्शनला क्लिक करताच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील माहिती तत्काळ मिळणार आहे. या वेबसाईटवर रक्तदात्यांना आपली नोंदणी करता येणार आहे. ही वेबसाईट 2017 मध्ये सुरू करण्यात आली आहे.

विविध प्रकारच्या आजारांच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असून रक्तपेढ्यांवर त्याचा भार पडतो. सध्या शासकीय रुग्णालयांमध्ये रक्तासह काही रक्तगटाचा तुटवडा आहे. खासगी रुग्णालयांमध्येही रक्ताच्या अभावामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना कसरत करावी लागत आहे.

रक्त मिळविण्यासाठी नातेवाईकांना धावाधाव करावी लागते. रक्तसाठ्याची नियमित माहिती मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाला ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिलने वेबसाईटचा पर्याय दिला आहे. रक्त किती आहे, कोणत्या पेढीत आहे, त्याची वर्गवारीसह सखोल माहिती
मिळते. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना रक्ताची पिशवी मिळवण्यास अधिक सुलभ झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news