राज्यसेवा परीक्षेतून वैभव सराटे यांची उपशिक्षणाधिकारीपदी निवड

राज्यसेवा परीक्षेतून वैभव सराटे यांची उपशिक्षणाधिकारीपदी निवड
Published on
Updated on

महूद : पुढारी वृत्तसेवा

जिद्द, चिकाटी व सातत्य याच्या जोरावर सर्वसामान्य कुटुंबातील मुलेही परिस्थितीवर मात करून प्रशासकीय सेवेत जाऊ शकतात. हे सांगोला तालुक्यातील चिक महूद येथील वैभव तामजी सराटे या सर्वसामान्य कुटुंबातील तरूणाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.राज्यसेवा परीक्षेतून वैभव सराटे याची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे.

वैभव तामजी सराटे हा अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे. शेती व पशुपालन हेच उपजीविकेचे साधन असणारे सराटे कुटुंबीय आजही चारी बाजूने पत्रा असलेल्या घरात राहतात. आर्थिक परिस्थिती हलक्याची असली तरी वैभव सराटे यांचे स्वप्न मोठे होते. त्याचे प्राथमिक शिक्षण चिकमहूद येथील प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण गावातीलच सुशीलकुमार शिंदे माध्यमिक विद्यालयात झाले. फलटण येथील मालोजीराजे शेती विद्यालयातून त्याने अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुणे येथील अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज मधून बी.एस्सी.ग्री ही पदवी मिळवली.

शिक्षण पूर्ण होताच त्याने राज्यसेवेच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासनात दाखल होण्याचे ध्येय बाळगत त्याने कठोर मेहनत घेत अभ्यास केला. राहुरी येथे अभ्यास करणारा वैभव कोरोना महामारीच्या काळात घराकडे फिरकला नाही. राज्यसेवेच्या परीक्षेत तो 97 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. विद्यार्थ्यांनी आपण किती हुशार आहोत, यापेक्षा आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी किती चिकाटी व सातत्य ठेवतो हे महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवावे, असे वैभव सराटे याने सांगितले. वैभव सराटे याच्या यशाबद्दल चिकमहूद येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते त्याचा नागरी सत्कार करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news