रक्तवाढीसाठी ‘हा’ आहार ठरतो गुणकारी

रक्तवाढीसाठी ‘हा’ आहार ठरतो गुणकारी
Published on
Updated on

नवी दिल्ली : काही लोकांना, विशेषतः महिलांना 'अ‍ॅनिमिया'चा त्रास होत असतो. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. हिमोग्लोबिन या प्रोटिनमध्ये लोह (आयरन) आढळते जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. जर शरीरातील रक्ताची पातळी कमी झाली तर आयर्न सप्लिमेंट घ्याव्या लागतात. हे टाळण्यासाठी या समस्येवर काही नैसर्गिक उपाय करता येतात. काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास ते रक्तातील आयरन वाढवण्यासाठी मदत करू शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

रेड मीट, डाळी, अंडी, बीन्स, सुका मेवा अशा पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील रक्ताची पातळी योग्य राहण्यास मदत मिळते. सुका मेवा तसेच डाळी रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच डाळ शिजवताना जास्त वेळ शिजवू नये त्यामुळे त्यातील पोषक घटक नष्ट होऊ शकतात. हिमोग्लोबिन आणि लोहाच्या कमतरतेमुळे 'अ‍ॅनिमिया' हा आजार होऊ शकतो. शरीरात वेगवेगळ्या भागात ऑक्सिजनचा पुरवठा करणार्‍या लाल रक्तपेशींची संख्या कमी होते. त्यामुळे अशा व्यक्तीला सतत थकवा जाणवतो, तसेच यामुळे अँगजायटी, डिप्रेशन अशा समस्या देखील उद्भवू शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news