‘या’ पोषक तत्त्वांच्या कमतरतेनेही वाढतो लठ्ठपणा

‘या’ पोषक तत्त्वांच्या कमतरतेनेही वाढतो लठ्ठपणा

नवी दिल्ली : सध्या लठ्ठपणा हा जगभरात चिंतेचा विषय आहे. जगभरातील अनेक लोक या समस्येने त्रस्त आहेत. बरेचदा असे मानले जाते की जास्त खाणे आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे वजन वाढते. मात्र, याचे आणखी एक कारण आहे ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. शरीरात काही पोषक तत्त्वांची कमतरतादेखील लठ्ठपणास कारणीभूत ठरू शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

शरीराला आपलं काम नीट करण्यासाठी अनेक पोषक तत्त्वांची गरज असते आणि कोणत्याही पोषक तत्त्वांची कमतरता असेल तर आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात. इतकंच नव्हे तर शरीरातील अशी पोषक तत्त्वांची कमतरता देखील तुम्हाला लठ्ठपणाचे शिकार बनवू शकते. जीवनसत्त्व 'ड' हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक आहे. याची कमतरता चयापचय बिघडवू शकते, ज्यामुळे चरबी जाळण्यात अडथळा येतो आणि वजन वाढते.

ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड आपल्या शरीराला सामान्यपणे कार्य करण्यास मदत करते. त्याच्या कमतरतेमुळे भूक संप्रेरक बिघडू शकतात, ज्यामुळे कॅलरीयुक्त खाद्यपदार्थ आणि अधिक अन्नाची लालसा वाढू शकते व परिणामी वजन वाढते. प्रथिने हे पौष्टिक पदार्थांपासून दूर ठेवतात. ते केवळ हाडे आणि स्नायू तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करत नाहीत तर उर्जेचा स्त्रोतदेखील आहेत. अशावेळी त्यांच्या कमतरतेमुळे खाण्याची लालसा वाढते, ज्यामुळे वजन वाढू शकते.

'बी 12' आणि 'बी 6' सारखे जीवनसत्त्वदेखील आपल्या शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे. शरीरात त्यांच्या कमतरतेमुळे थकवा आणि साखरेची लालसा उद्भवू शकते, ज्यामुळे वजन वाढते. आयोडीन देखील एक अत्यंत महत्त्वाचे पोषक आहे, ज्याची कमतरता असल्यास शरीरात हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो, ज्यामुळे चयापचय कमी होऊ शकते आणि वजन वाढू शकते. लोहाच्या कमतरतेमुळे केवळ अ‍ॅनिमियाच होतो असे नाही तर यामुळे बर्‍याचदा थकवा येऊ शकतो, चयापचय बिघडू शकते आणि वजनही वाढू शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news