‘या’ ठिकाणी विवाहावेळी नववधूला मारून-मारून ‘रडविले’ जाते

‘या’ ठिकाणी विवाहावेळी नववधूला मारून-मारून  ‘रडविले’ जाते

बीजिंग : भारतात विवाहानंतर पहिल्यांदा सासरी जाताना नववधू हमखास रडताना दिसतात. कारण ती पित्याचे घर सोडून दुसर्‍या नव्या घरी जात असते. अशीच रडण्याची परंपरा चीनमध्येही आहे. मात्र, ती जरा विचित्र आणि हटके आहे. तेथे विवाहावेळी वधूला रडावेच लागते. जर तिला रडू आले नाही तर मारून मारून रडविले जाते.

चीनमधील दक्षिणी प्रांत 'सिचुआन'मध्ये हजारो वर्षांपासून 'तूजिया' नामक जनजातीचे लोक राहतात. या जनजातीमध्ये शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या अनेक विचित्र परंपरा आजही पाळल्या जातात. यापैकी एक म्हणजे विवाहादरम्यान नववधूचे रडणे. यासंदर्भात 'ऑडिटी सेंटल वेबसाईट'ने दिलेल्या माहितीनुसार नववधूने रडण्याची परंपरा 17 व्या शतकात फारच लोकप्रिय होती आणि ती 1911 मध्ये क्विंग साम्राज्यापर्यंत पाळली जात होती. आजही या परंपरेचे पालन केले जाते.

जाणकारांच्या अंदाजानुसार विवाहावेळी वधूने हमखास रडण्याची ही परंपरा इ.स. पूर्व 475 ते इ.स. पूर्व 221 दरम्यान सुरू झाली. त्यावेळी जाओ स्टेटची राजकुमारीचा विवाह येन राज्यात झाला. तेव्हा राजकुमारीची आई ओक्साबोक्सी रडली होती आणि तिने आपल्या मुलीला परतण्याची विनंती केली. हा विवाहावेळी रडण्याचा पहिला प्रसंग होता. याचदरम्यान नववधूच्या रडण्याच्या प्रथेस सुरुवात झाली. जी वधू विवाहावेळी रडत नाही, ती संपूर्ण गावात चेष्टेचा विषय ठरते. तसेच तिला रडवण्यासाठी प्रसंगी मारबडवही केली जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news