‘या’ कंपनीचा शेअर मिळवून देईल भरघोस नफा

‘या’ कंपनीचा शेअर मिळवून देईल भरघोस नफा

यावेळचा 'चकाकता हिरा' म्हणून 'स्टरलाईट टेक्नॉलॉजीज'ची निवड केली आहे. ही भारतीय कंपनी असून आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपनी आहे. हिचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. या कंपनीकडे 636 पेटंट्स (स्वामित्व हक्क) आहेत. एकूण 150 देशांतही कार्यरत आहे. हिच्याकडे 5000 कर्मचारी असून 1 कोटी रुपये तिचा नक्त नफा आहे. 1 बिलियन डॉलर्स तिच्या समभागांचे आजचे बाजारी मूल्य आहे.

टेलिकॉम व ऊर्जाक्षेत्रात ती कार्यरत आहे. भारत आता 5-जी तंत्रज्ञानाचा अवलंब करणार असल्याने या कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल. सध्याचा या कंपनीच्या शेअरचा भाव 175 रुपयांच्या आसपास आहे. तो सात-आठ महिन्यांत 225 रुपये होऊ शकतो. ही वाढ 30 टक्के असेल. या क्षेत्रातील दुसरी नामवंत कंपनी विंध्या टेलिलिक्स ही आहे. या कंपनीच्या शेअरचा गेल्या 12 महिन्यांतील किमान भाव 128 रु. होतो. तो सध्या 175 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजे 8 महिन्यांत तो 40 टक्के वाढला आहे. या कं पनीचा घसारा, व्याज, कर आणि मुदती कर्जाचे हप्ते देण्यापूर्वीचे उत्पन्न आर्थिक वर्ष मार्च 2021, 2022 व 2023 साठी 810 रु. 534 रु. 784 रु. आहे / व्हावे.

-डाॅ. वसंत पटवर्धन

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news