यंदाची आषाढीवारी निर्बंधमुक्त, सरकारचा निर्णय

यंदाची आषाढीवारी निर्बंधमुक्त, सरकारचा निर्णय

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून राज्य सरकारने आषाढीवारी निर्बंधमुक्त केली आहे. कोरोनामुळे सलग दोन वर्षे वारी न झाल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सोमवारी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिंडीच्या आयोजनाबाबत चर्चा झाली. काही दिवसांतच वारीला सुरुवात होणार आहे. सलग दोन वर्षे वारी न झाल्यामुळे यंदाच्या वारीत जवळपास
दहा ते पंधरा लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. सध्या वारीबाबतचे नियोजनही शेवटच्या टप्प्यात आहे.

लोकभावनेचा विचार

राज्यात रोज एक हजारांवर कोरोना रुग्ण आढळत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह राज्यातील सहा जिल्ह्यांत रुग्णवाढ मोठी आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी लोकभावनेचा विचार करून सरकारने यंदाची वारी निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालखी मार्गावर दर पाच किलोमीटर अंतरावर शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. एक हजार 800 फिरत्या शौचालयांची सुविधा देण्यात येणार आहे. त्यापैकी 50 टक्के शौचालये महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेमार्फत पालखी मार्गावर सॅनिटायझर, औषधे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. वारीच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूची मटणाची व दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे टोपे यांनी सांगितले.

दहा ते पंधरा लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. सध्या वारीबाबतचे नियोजनही शेवटच्या टप्प्यात आहे.

राज्यात रोज एक हजारांवर कोरोना रुग्ण आढळत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह राज्यातील सहा जिल्ह्यांत रुग्णवाढ मोठी आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी लोकभावनेचा विचार करून सरकारने यंदाची वारी निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.पालखी मार्गावर दर पाच किलोमीटर अंतरावर शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. एक हजार 800 फिरत्या शौचालयांची सुविधा देण्यात येणार आहे. त्यापैकी 50 टक्के शौचालये महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेमार्फत पालखी मार्गावर सॅनिटायझर, औषधे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. वारीच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूची मटणाची व दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे टोपे यांनी सांगितले.

पंढरपूर 
कोरोनानंतरची सर्वात मोठी आषाढी यात्रा भरत आहे. मात्र, पुन्हा कोरोना डोके वर काढत असल्याने खबरदारी म्हणून पालखींबरोबर येणार्‍यांनी मास्क वापरावा व लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे आढावा बैठकीत ते बोलत होते.

भरणे म्हणाले, कोरोनानंतर पहिलीच खुलेपणाने वारी होत आहे. या वारीला जवळजवळ 16 लाख भाविक यात्रेला येतील. त्याअनुषंगाने तयारी करावी. भविष्यातील पुढील 50 वर्षाचे नियोजन म्हणून शहरातील पिण्याच्या पाण्याची क्षमता वाढवणे व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प तयार करणे गरजेचे आहे. आराखडा तयार करा, त्याला निधी देऊ. भंडीशेगाव पालखी तळाचा विकास करण्यात येईल. कोरोना लसीकरण मोहीम राबवा, वीज, पाणी पुरवठा करा, रेल्वे चा प्रश्न मिटवा. कोरोननंतर भाविकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ती अधिकारी व कर्मचार्‍यांनी चोखपणे पार पाडावी. असा सांगत कामात हयगर करणार्‍यांवर कारवाई देखील करण्यात येईल.

अवताडे म्हणाले, वारी काळात नदीपात्रात जे मिसळणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. तरच नदीपात्र स्वच्छ राहील अन्यथा या नदीपात्राच्या काठावर असलेले, पाणी पुरवठा योजनांवर अवलंबून असलेल्या गावातील लोक वारीनंतर महिनाभर आजारी पडतात. तसा प्रकार होऊ नये. शहरात पाणी पुरवठा करणार्‍या पाईप लाईन अपुरी पडत आहे. त्यामुळे वारी काळात पाणी पुरवठा कमी पडतो. तो वाढवण्याची गरज आहे. वारी काळात आरोग्य सुविधा अपुरी पडते, यात सुधारणा करण्याची गरजेचे आहे.

शंभरकर म्हणाले, वारकर्‍यांच्या दृष्टीने चांगली सेवा देण्यासाठी वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. प्रत्यक्ष पाहणी करुन कामाबाबत सुचना देण्यात येत आहेत. वेळेत वीज, पाणी, आरोग्य, वाहतूक नियोजन करण्यात येत आहे.

ज्ञानेश्वर महाराज जळगावकर म्हणाले, पालखी मार्गावरची कामे पूर्ण व्हावीत, जेथे उड्डाणपूल आहे. तेथे समस्या उद्भवणार आहे. पालखी मुक्कामी पाणी, वीज पुरवठा करुन मुरुमीकरण करणे गरजेचे आहे. सरगम चौक रेल्वे चा पालख्यांना उंचीचा प्रश्न आहे, तो तात्काळ सोडवावा.वारी काळात दिवसातून शहरात दोन वेळा नळपाणी पुरवठा करावा असे सांगून कागदावर नियोजन न करता व्यवस्थित पार पाडावे.

वारी होत आहे. या वारीला जवळजवळ 16 लाख भाविक यात्रेला येतील. त्याअनुषंगाने तयारी करावी. भविष्यातील पुढील 50 वर्षाचे नियोजन म्हणून शहरातील पिण्याच्या पाण्याची क्षमता वाढवणे व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प तयार करणे गरजेचे आहे. आराखडा तयार करा, त्याला निधी देऊ. भंडीशेगाव पालखी तळाचा विकास करण्यात येईल. कोरोना लसीकरण मोहीम राबवा, वीज, पाणी पुरवठा करा, रेल्वे चा प्रश्न मिटवा. कोरोननंतर भाविकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ती अधिकारी व कर्मचार्‍यांनी चोखपणे पार पाडावी. असा सांगत कामात हयगर करणार्‍यांवर कारवाई देखील करण्यात येईल.

अवताडे म्हणाले, वारी काळात नदीपात्रात जे मिसळणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. तरच नदीपात्र स्वच्छ राहील अन्यथा या नदीपात्राच्या काठावर असलेले, पाणी पुरवठा योजनांवर अवलंबून असलेल्या गावातील लोक वारीनंतर महिनाभर आजारी पडतात. तसा प्रकार होऊ नये. शहरात पाणी पुरवठा करणार्‍या पाईप लाईन अपुरी पडत आहे. त्यामुळे वारी काळात पाणी पुरवठा कमी पडतो. तो वाढवण्याची गरज आहे.

वारी काळात आरोग्य सुविधा अपुरी पडते, यात सुधारणा करण्याची गरजेचे आहे.शंभरकर म्हणाले, वारकर्‍यांच्या दृष्टीने चांगली सेवा देण्यासाठी वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. प्रत्यक्ष पाहणी करुन कामाबाबत सुचना देण्यात येत आहेत. वेळेत वीज, पाणी, आरोग्य, वाहतूक नियोजन करण्यात येत आहे. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर म्हणाले, पालखी मार्गावरची कामे पूर्ण व्हावीत, जेथे उड्डाणपूल आहे. तेथे समस्या उद्भवणार आहे. पालखी मुक्कामी पाणी, वीज पुरवठा करुन मुरुमीकरण करणे गरजेचे आहे. सरगम चौक रेल्वे चा पालख्यांना उंचीचा प्रश्न आहे, तो तात्काळ सोडवावा.वारी काळात दिवसातून शहरात दोन वेळा नळपाणी पुरवठा करावा असे सांगून कागदावर नियोजन न करता व्यवस्थित पार पाडावे.

  • पालखी मार्गाचे 90 टक्के काम पूर्ण • पालखी मार्गावर 22 उड्डाण पूल, 7 पुलांंचे काम पूर्ण
  • पंढरपूर येथे 10 तर जिल्ह्यात 21 आपत्ती व्यवस्थापन कक्ष • पालखी मार्गावर 49 टँकर तर 51 ठिकाणी पाणी व्यवस्था
  • पंढरपूर शहरात 24 हजार कायमस्वरूपी शौचालये
  • 8 जुलै रोजी पालखी वाखरी मुक्कामी, 9 रोजी पंढरपुरात दाखल
  • 10 रोजी एकादशीचा मुख्य सोहळा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news