मोबाईल पोर्टेबिलिटीवर नियंत्रण आणा!

मोबाईल पोर्टेबिलिटीवर नियंत्रण आणा!

मुंबई/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दूरसंचार कंपन्यांनी चॅनेल, डिस्ट्रीब्युटर्स, रिटेलरच्या माध्यमातून ग्राहकांना कोणत्याही प्रकारची आकर्षित करणारी विशेष सेवा ऑफर करू नये. कंपन्यांच्या या आमिषाला बळी पडत ग्राहक मोबाईल पोर्टेबिलिटी करत असून, हा प्रकार रोखण्याचे कडक आदेश गुरूवारी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दिले.

एका दूरसंचार कंपनीकडून पोर्टेबिलिटीबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर यासंबंधीची नियमावली ट्रायने जारी केली आहे. मोबाईल पोर्टेबिलिटी च्या नावाखाली दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांना विशेष प्रकारच्या योजना ऑफर केल्या जात आहेत. त्यामुळे मोबाईल ग्राहक वेगाने एक नेटवर्कमधून दुसर्‍या नेटवर्ककडे वेगाने आकर्षित होताना दिसत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दूरसंचार कंपन्याकडून ग्राहकांना चॅनेल, वितरक,अथवा अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना विशेष ऑफर दिली जाते. त्यावर तत्काळ नियंत्रण आणा. सेवेची विक्री आणि मार्केटींगच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित केले जाते. हे रोखण्याचे आणि नियमावलींचे पालन करण्याची जबाबदारी आणि त्याचे दायित्व दूरसंचार कंपन्यावर राहील, असे ट्रायने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news