मुंबईकरांची होणार आता धुळीतून सुटका

मुंबईकरांची होणार आता धुळीतून सुटका
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबईत मोठ्या प्रमाणात इमारतीचे बांधकाम सुरू असून बांधकामांतील धूळ रोखण्यासाठी बिल्डरांसाठी नवीन नियमावली करण्यात आली आहे. या बांधकाम क्षेत्रातील डेब्रिजची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने मेघा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी २१ वर्षांचे कंत्राट देण्यात आले असून यासाठी तब्बल १ हजार २४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसापासून हवेची गुणवत्ता ढासळते आहे. हवामान बदल, रस्त्यांवरील व बांधकामातील धूळ, वाहतूक कोंडी, उद्योग व उर्जा क्षेत्र आणि कचरा जाळणे हे चार प्रमुख घटक कारणीभूत आहेत. शहरात दररोज सुमारे १२०० ते १५०० मेट्रिक टन डेब्रिज गोळा होते. हे डेब्रिज सध्या देवनार डंपिंग ग्राऊंडवर टाकले जात आहे. त्यामुळे डेब्रिजच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यासाठी पालिकेने पहिल्या टप्प्यात पश्चिम उपनगरातील नऊ विभागांतील डेब्रिज संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्याचे कंत्राट न्टोनी वेस्ट हँडलिंग सेल कंपनीला दिले आहे. कंपनीद्वारे दररोज प्रत्येकी ६०० मेट्रिक टन डेब्रिजवर प्रक्रिया करणारे दोन प्रकल्प उभारले जाणार आहेत. डेब्रिजवर यांत्रिक प्रक्रिया करून त्यातून बांधकाम क्षेत्राशी संबंधित उपयुक्त उत्पादने बनवली जाणार आहेत. या उत्पादनांची बाजारात विक्री करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर सोपवण्यात येणार आहे.

डेब्रिजवर पालिकेकडून उपाययोजना

शहरातील वायू उत्सर्जनामध्ये बांधकाम व पाडकाम कचऱ्याचा मोठा वाटा आहे. दररोज निर्माण होणाऱ्या या कचऱ्याचा योग्य अंदाज लावणे, बांधकाम प्रकल्पांचा मागोवा घेणे, डेब्रीज वाहून नेणारी वाहने झाकणे आणि पुनर्वापराकरीता नेल्या जाणाऱ्या डेब्रीजवर योग्य ती देखरेख ठेवणे, यासाठी पालिकेकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news