मुंबई : बुलेट ट्रेनच्या कामांना वेग

मुंबई : बुलेट ट्रेनच्या कामांना वेग

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम महाराष्ट्रात वेग घेत आहे. राज्यात जानेवारीपर्यंत 46.71 टक्के जमीन संपादीत करण्यात आली होती. त्यात वाढ होऊन मे महिन्यात 70 टक्क्यांपेक्षा जास्त जमिनीचे भूसंपादन झाले आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक भूसंपादन झाले आहे. ठाणे जिल्ह्यात 141.26 हेक्टर जमिनीपैकी 110.49 हेक्टर जमीन नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने ताब्यात घेतली आहे.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे गुजरात राज्यात काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. राज्यात आतापर्यंत 70 टक्के जमीन संपादीत करण्यात आली आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. वापी ते वडोदरा दरम्यान रुळांच्या कामाचे पहिले कंत्राट खठउजछ इंटरनॅशनल लिमिटेडला 24 डिसेंबर 2021 रोजी देण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील आठ स्थानकांसह गुजरातच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये बांधकाम कामे जोरात सुरू आहेत. 2026 मध्ये गुजरातमध्ये बुलेट ट्रेनच्या चाचण्या सुरू करण्याचा नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचा विचार आहे. ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनकरिता 141.26 हेक्टरपैकी 110.49 हेक्टर जमीन संपादीत केली आहे. पालघर जिल्ह्यात 287.74 हेक्टर जमिनीपैकी 198.6 हेक्टर जमीन ताब्यात घेतली आहे. बुलेट ट्रेनकरिता राज्यात 433.82 हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यापैकी 309.09 हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सुमारे 124 हेक्टर जमीन अद्याप संपादीत केलेली नाही. त्यापैकी 4.96 हेक्टर जमीन राज्य सरकारची, 32.23 खाजगी पक्षांची आणि 95.85 हेक्टर वन विभागाची आहे.

बीकेसीतील जमिनीसाठी संघर्ष सुरूच

बुलेट ट्रेनच्या मुंबईतील सुरुवातीचे स्थानक वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) आहे. परंतु, अद्याप ही जमीन नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ताब्यात आलेली नाही. बीकेसीतील बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित स्थानकाच्या जागेवर भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे. हा पेट्रोल पंप पर्यायी जमिनीवर स्थलांतरित केला जाणार आहे.

तीन डेपो उभारणार

बुलेट ट्रेनसाठी एकूण तीन डेपो उभारण्यात येणार आहेत. यातील साबरमती आणि सूरत हे दोन डेपो गुजरातमध्ये, तर महाराष्ट्रातील भिवंडी तालुक्यात एक डेपो उभारण्यात येणार आहे. भिवंडी डेपोत 36 बुलेट ट्रेन हाताळण्याची क्षमता असणार आहे. भिवंडी तालुक्यातील भारोडी, अंजुर या दोन गावांमध्ये हा डेपो उभारण्यात येणार आहे. या डेपोत बुलेट ट्रेन गाड्यांची देखभाल-दुरुस्ती तसेच त्या तेथे उभ्या केल्या जाणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news