मुंबई बँक निवडणुकीत प्रवीण दरेकर यांचे वचर्स्व

मुंबई बँक निवडणुकीत प्रवीण दरेकर यांचे वचर्स्व
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : विरोधकांनी केलेले आरोप, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या कथित चौकशा आणि बजावलेल्या नोटिसा या पार्श्‍वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई बँक विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकून मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेवर आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले.

मुंबई बँक निवडणुकीत बँकेच्या 17 जागा याआधीच सहकार पॅनलने बिनविरोध जिंकल्या होत्या. उरलेल्या 4 जागांसाठी निवडणुकीची औपचारिकता म्हणून रविवारी मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होऊन या चारही जागांवर दरेकर यांच्या सहकार पॅनलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला.

मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कन्झ्युमर्स) मतदारसंघातून विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव करीत 18 मते घेतली, तर चौगुले यांना 16 मते मिळाली. प्राथमिक ग्राहक मतदारसंघात पुरुषोत्तम दळवी यांनी 131 मते घेत कमलाकर नाईक यांचा पराभव केला. नाईक यांना फक्‍त 59 मते मिळाली. महिला सहकारी संस्था मतदारसंघात जयश्री पांचाळ यांना 332 मते मिळाली. त्यांच्याविरोधात शालिनी गायकवाड यांनी 188 मतांपर्यंतच मजल मारली. भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदारसंघात अनिल गजरे यांना तब्बल 4 हजार मते मिळाली. यलाप्पा कुशाळकर यांना फक्‍त 350 मते मिळाली.

सेनेच्या बंडखोरांना धूळ चारली

प्रवीण दरेकर यांच्या पॅनलमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित उमेदवारांचा समावेश होता. पहिल्याच फेरीत जे 17 उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यात प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे दोन उमेदवारही बिनविरोध निवडून आणले. असे असताना शिवसेना बंडखोरांनी चार ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया पार पडली.

मुंबई बँकेत अभिजीत घोसाळकर, सुनील राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते, तर निवडणुकीतून शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी माघार घेतली. कमलाकर नाईक यांनी बंडखोरी कायम ठेवली. प्रवीण दरेकर यांनी सेना बंडखोरांचे डावपेच उधळून लावत त्यांना धूळ चारली.

बिनविरोध विजयी

1) आमदार प्रवीण यशवंत दरेकर, नागरी सहकारी बँक
2) संदीप सीताराम घनदाट, नागरी सहकारी बँक
3) आमदार प्रसाद मिनेश लाड, पगारदार सहकारी संस्था
4) शिवाजीराव विष्णू नलावडे, नागरी सहकारी पतसंस्था
5) आमदार सुनील राजाराम राऊत, गृहनिर्माण संस्था
6) अभिषेक विनोद घोसाळकर, गृहनिर्माण संस्था
7) आमदार प्रवीण यशवंत दरेकर, मजूर सहकारी संस्था
8) आनंदराव बाळकृष्ण गोळे, मजूर सहकारी संस्था
9) सिद्धार्थ तात्यासाहेब कांबळे, औद्योगिक सहकारी संस्था
10) विष्णू गजाभाऊ घुमरे, औद्योगिक सहकारी संस्था
11) नंदकुमार मानसिंग काटकर, इतर सहकारी संस्था
12) जिजाबा सीताराम पवार, इतर सहकारी संस्था
13) सोनदेव बाळाजी पाटील, व्यक्तिगत (वैयक्तिक)
14) शिल्पा अतुल सरपोतदार, महिला राखीव मतदारसंघ
15) कविता प्रकाश देशमुख, महिला राखीव मतदारसंघ
16) विनोद दामू बोरसे, अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ
17) नितीन धोंडीराम बनकर, इतर मागासवर्गीय मतदारसंघ
18) अनिल गजरे, भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदारसंघ
19) जयश्रीताई पांचाळ, महिला सहकारी संस्था मतदारसंघ
20) विठ्ठलराव भोसले, मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदारसंघ (होलसेल कन्झ्युमर्स)
21) पुरुषोत्तम दळवी, प्राथमिक ग्राहक संस्था मतदारसंघ

जनतेच्या विश्वासाचा विजय : प्रवीण दरेकर

सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आमच्या नेतृत्वावर व सहकार पॅनलवर विश्वास टाकत 21 पैकी 21 जागा निवडून दिल्या, त्याबद्दल मी सर्व मुंबईकरांचे, सहकार चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मुंबईकरांनी जात-धर्म अन् पक्षांच्याही पलीकडे जाऊन मुंबई बँकेच्या हितासाठी, आमच्या सहकार पॅनलवर विश्वास दाखवला. यापुढे मुंबईसह महाराष्ट्रात मुंबई बँकेचे सर्वोच्च स्थान राहील, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news