मान्सून २४ पर्यंत बरसणार! मुंबई, कोल्हापूरसह ९ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

file photo
file photo

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील उत्तर महाराष्ट्र व विदर्भातून मान्सून माघारी गेला असला तरीही कोकण व मध्य महाराष्ट्रात मात्र त्याचा मुक्काम 24 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. दरम्यान, राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूरसह एकूण नऊ जिल्ह्यांत 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मान्सूनच्या परतीचा प्रवास रविवारी उत्तर भारतातील बिलासपूर, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, प. बंगाल या राज्यांतून झाला. महाराष्ट्रात विदर्भातून तो रविवारी परतीला निघाला. यात बुलढाणा, ब्रह्मपुरी या ठिकाणाहून त्याने प्रस्थान केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मात्र, कोकण व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात त्याचा मुक्काम 24 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अरबी समुद्रातही वार्‍याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच हिमालयात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात आगामी तीन दिवस जोरदार पावसाचे संकेत दिले आहेत. 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान राज्यातील नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट (18-20 ऑक्टोबर)  मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा.

यलो अलर्ट (17-19 ऑक्टोबर) पुणे (17), कोल्हापूर (17), सातारा (17), सांगली (18 व 19), पालघर
(17), ठाणे (17), नगर (17 व 18), पुणे (17), औरंगाबाद (18, 19), जालना (18), परभणी (17 व 18), बीड (17 ते
19), हिंगोली (19), नांदेड (17 ते 19), लातूर (17 ते 19), उस्मानाबाद (17 ते 19), वाशिम (18), यवतमाळ (18)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news