नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्याविरुद्धचा दिल्ली उच्च न्यायालयात केलेला मानहानीचा खटला त्यांचा पुर्वाश्रमीचा प्रियकर जय अनंत देहाडराय यांनी गुरुवारी (२५ एप्रिल) मागे घेतला. या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयानेही परवानगी दिली.
देहाडराय यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यामध्ये त्यांनी दावा केला होता की, "मोईत्रा यांच्या लोकसभा लॉगीन प्रकरणानंतर खोटी, अपमानास्पद आणि बदनामीकारक विधाने केली." यानंतर त्यांनी शांतेतेचे कारण देत गुरुवारी मानहानीचा खटला मागे घेण्याची विनंती दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली.
न्यायमूर्ती प्रतिक जालान यांनी टिप्पणी केली की अनंत देहादराई यांची सूचना सकारात्मक आहे की दोन्ही पक्षांनी एकमेकांवर वैयक्तिक आरोप न करण्याबाबत सहमती दर्शविली आणि विवाद सार्वजनिक क्षेत्राच्या बाहेर काढला तर ते दोन्ही पक्षांना फायदेशीर ठरेल .