महासागर शोषून घेताहेत प्रमाणापेक्षा जास्त उष्णता

महासागर शोषून घेताहेत प्रमाणापेक्षा जास्त उष्णता

वॉशिंग्टन : समुद्र आणि महासागर हे मानवनिर्मित कार्बनडायऑक्साईड व उष्णता मोठ्या प्रमाणात शोषून घेत आहेत. पृथ्वीवरील या महाकाय जलसाठ्यांना माणसाने गेल्या 50 वर्षांत प्रमाणापेक्षाही जास्त कामाला जुंपले आहे. सध्या समुद्र आणि महासागर ओव्हरटाईम करत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. अशाप्रकारे आपल्या क्षमतेपेक्षा तब्बल 90 टक्के उष्णता ते शोषून घेत आहेत. यासंबंधीचे संशोधन 'नेचर कम्युनिकेशन'मध्ये प्रसिद्ध झाले.

नव्या संशोधनातील निष्कर्षाने शास्त्रज्ञही चकित बनले आहेत. शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी एक 'ग्लोबल ओशन सर्क्युलेशन मॉडेल' तयार केले होते. जेणेकरून गेल्या 50 वर्षांत समुद्राच्या पाण्याचे तापमान किती वाढले आहे, हे समजेल. शास्त्रज्ञांच्या मते, दक्षिणेकडील समुद्र हे उत्तरेकडील समुद्रापेक्षा वातावरणातील जास्त उष्णता शोषून घेत आहेत.

शास्त्रज्ञांच्या मते, जर समुद्रांनी वातावरणातील प्रमाणापेक्षाही जास्त उष्णता शोषून घेतल्यास त्याचा समुद्राच्या 'इकोसिस्टीम'वर प्रतिकूल परिणाम होणार आहे. असे जर काही शतके सुरू राहिले तर समुद्राच्या अंंतर्गत भागात जास्त उष्णता जमा होणार आहे. यामुळे तेथील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होईल. अशा स्थितीत शोषून घेतलेली उष्णता समुद्र पुन्हा वातावरणात सोडू लागतील. असे जर खरोखच भविष्यात झाले तर तेव्हाची स्थिती फारच गंभीर असेल. यासाठी सर्व देशांनी कार्बनडायॉक्साईडचे उत्सर्जन कमी करणे अत्यंत गरजेचे आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news