महाराष्ट्र गट ‘क’ मुख्य परीक्षा तयारी-2

महाराष्ट्र गट ‘क’ मुख्य परीक्षा तयारी-2

भारतीय राज्यघटना – यामध्ये घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे. घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ भूमिका अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ विधानसभा, विधान परिषद व त्याचे सदस्य, अधिकार, कार्ये व भूमिका विधी समित्या.

संदर्भ – भारतीय संविधानातील तरतुदी, इंडियन पॉलिटी – साईनाथ प्रकाशन, इंडियन पॉलिटी – लक्ष्मीकांत, महाराष्ट्र शासन आणि राजकारण – फडके / विद्या प्रकाशन.

माहिती अधिकार अधिनियम 2005

या घटकासाठी संदर्भ यशदा प्रकाशन व माहितीचा अधिकार विद्या प्रकाशन औरंगाबाद, तसेच के सागर प्रकाशन किंवा युनिक प्रकाशनचे एक कोणतेही पुस्तक.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 – यासाठी संदर्भ के सागर प्रकाशन संगणक व माहिती तंत्रज्ञान – यामध्ये आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रांतील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळविण्यासाठी होणारा उपयोग. भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा. शासनाचे कार्यक्रम मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इ. माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे व्यक्तिमत्त्व.

संदर्भ – संपूर्ण संगणक ksagar
संगणक – साई, मोती प्रकाशन
संगणक व माहिती तंत्रज्ञान – व्हिजन प्रकाशन किंवा रिलायबल

मानवी हक्क व जबाबदार्‍या –

आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतुदी, भारतातील मानवी हक्क व जबाबदार्‍या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण. भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहणार्‍या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्र्रथा यांसारख्या अडचणी. लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

संदर्भ – मानवी हक्क व जबाबदार्‍या – अमर शेख
मानवी हक्क – चंद्रकांत मिसाळ
दारूबंदी अधिनियम कायदा – 1949 के सागर प्रकाशन
सेल्फ स्टडी प्रकाशनचे – देवदत्त पाचपोळे यांचे excise manual मराठीमध्ये नोटस्.
Excise law and narcotics – श्रीनिवास पाटील यांचे पुस्तक.

प्रा. जॉर्ज क्रुझ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news