महापुरातून हत्तीवरून पार केली गंगा!

महापुरातून हत्तीवरून पार केली गंगा!

पाटणा : कधी कधी भलतेच अनपेक्षित प्रसंग येत असतात आणि अशावेळी आपल्या धैर्याची आणि प्रसंगावधानाची कसोटी लागत असते. बिहारमध्ये वैशालीच्या राघोपूरमध्ये अशीच एक घटना घडली. तिथे एक माहूत हत्तीला घेऊन गंगेच्या पाण्यात उतरला होता. त्यावेळी अचानक गंगेच्या पाण्यात वाढ झाली आणि नदी दुथडी भरून वाहू लागली. अशा पाण्यात अडकल्यावर माहुताने हत्तीवरूनच पैलतीर गाठले!

अचानक पाणी वाढल्याने हत्ती तसेच हत्तीच्या पाठीवर बसलेला माहूत दोघेही अडकले. हत्तीला बाहेर काढण्यासाठी मोठ्या नावेची गरज होती. माहुताकडे पैसे किंवा खाण्या-पिण्याचे साहित्यही अधिक नव्हते. त्याने हत्तीवरूनच नदी पार करण्याचे ठरवले. या हत्तीच्या कानापर्यंत नदीचे पाणी होते. अशा पाण्यातून हत्तीही न डगमगता पुढे चालू लागला. अधूनमधून श्वास घेण्यासाठी सोंड वर करीत असे. माहूत हत्तीचे कान घट्ट पकडून बसला होता.

काठावरचे लोक हे अनोखे द़ृश्य पाहून थक्क झाले व अनेकांनी दोघांचा व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. अनेकदा त्यांना वाटले की गंगेच्या जोरदार प्रवाहात दोघे कदाचित वाहून जाणार. मात्र, सुदैवाने तसे घडले नाही. रुस्तमपूर घाटापासून पाटणा जेठुकी घाटापर्यंत एक किलोमीटर अंतर हत्तीने पोहून पार केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news