उमरगा : मराठा आरक्षणासाठी बुधवारी (दि.६) दुपारी जीवन संपवलेल्या केलेल्या माडज (जि. धाराशिव) येथील किसन माने (वय 30) याच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या जीवन संपवलेल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने चारचाकी वाहन पेटवून दिल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. माने याचा मृतदेह रात्री तलावातून बाहेर काढल्यानंतर गुरुवारी सकाळी उपविभागीय कार्यालयासमोर ठेवण्यात आला होता.